Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वसंतदादा स्मारकाचे उर्वरित कामाचे प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवा माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील

वसंतदादा स्मारकाचे उर्वरित कामाचे प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवा माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील


सांगली : थोर स्वातंत्रसेनानी, माजी मुख्यमंत्री, माजी राज्यपाल पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मारकांचे काम गेली अनेक वर्षे जुने स्टेशन चौक, सिटी पोस्ट सांगली येथे सुरू आहेत. सदरच्या स्मारकाचे काम 75 टक्के पूर्ण आहे. त्यामध्ये अजूनही सुशोभीकरण, विद्युत, पाणी व्यवस्था, सभागृह, फोटो दालन, पत्राची रुफींग तसेच मागील कामाचे दुरुस्ती या सर्व कामे अंदाजपत्रके तयार करुन जिल्हाधिकारी सांगली यांचे मार्फत आपण तात्काळ शासनाकडे पाठवावे. माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांनी जिल्हाधिकारी सांगली डॉ. श्री. राजा दयानिधी यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

कै.पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मारकाच्या उर्वरित कामासाठी प्रतीक पाटील यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. सदर स्मारकाच्या सद्य परिस्थितीचा आढावा त्यांनी सांगितला. स्मारकासाठी शासनाने दिलेल्या अनुदानाची रक्कमेमध्ये हे स्मारक अद्याप पूर्ण होऊ शकले नाही. प्रचंड कामे स्मारकामध्ये अपूर्ण आहेत. जिल्‍हाधिकारी कार्यालय सांगली, कार्यकारी अभियंता मिरज यांच्याकडून  यांचेकडून शासनाकडे यापूर्वी बरीच अंदाजपत्रके पाठवले होते. त्‍यास सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांनी अद्याप प्रस्तावास मंजुरी दिली नाही. तर वरचेवर त्रुटी काढून जिल्हाधिकारी सांगली यांना त्रुटीची पत्रे त्यांनी पाठवले आहेत.

यावर माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, पालकमंत्री सुरेश खाडे,आमदार अनिलभाऊ बाबर आमदार विश्वजीत कदम, मंत्री चंद्रकांतदादा पाटील माजी मंत्री तथा आमदार अशोक चव्हाण, माजी मंत्री दत्तात्रय भारणे या सर्वांनी पत्रव्यवहार करुन सुद्धा शासनाने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाहीत. आणि उर्वरीत कामासाठी निधी मिळाला नाही. त्यामुळे सांगली येथील स्टेशन चौकातील पद्मभूषण कै. वसंतदादांचे स्मारक आजही अपूर्ण आहे. यावर आज जिल्हाधिकारी सांगली डॉ. राजा दयानिधी यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज क्रा़ंतीकुमार मिरजकर, सहाय्यक अभियंता अनिल पाटील व निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना बोलावून त्यांनी तात्काळ प्रस्ताव तयार करून पालकमंत्री यांनी नियुक्ती केलेल्या समितीची बैठक घेऊन इतिवृत्तासह शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची सूचना दिली. यावेळी उदय पवार,राजेंद्रप्रसाद जगदाळे, स्वीय सहाय्यक संजय कुलकर्णी उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.