Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रणरागिनींनी केला दारू, गांजा अड्डा उद‌्ध्वस्त ; तासगाव वडगावमधील महिला आक्रमक

रणरागिनींनी केला दारू, गांजा अड्डा उद‌्ध्वस्त ; तासगाव वडगावमधील महिला आक्रमक


तासगाव : वडगाव (ता. तासगाव) मध्ये कथित रामकृष्ण हरी मठाच्या आडुन अवैध दारू व गांजा विक्री सुरू होती. वारंवार तक्रार करूनही अवैध धंदे सुरूच असल्याने येथील संतप्त महिलांनी आक्रमकपणे दारू व गांजा अड्डा उद‌्ध्वस्त केला. आरोपीस तत्काळ अटक करण्यासाठी ठिय्या मांडला होता. वडगावच्या मठात गांजा अड्डा चालवला जात असतानाही तासगाव पोलिसांचे होणाऱ्या अक्षम्य दुर्लक्ष चर्चेचा विषय बनला आहे. महिलांच्या आक्रमक पवित्रामुळे पोलिसांच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहेत.

वडगाव येथे अंजनी रस्त्याजवळून काही अंतरावर शेतात द्राक्ष बागेच्याजवळ कथित रामकृष्ण हरी मठातील झोपडीत हा अवैध दारू व गांजाची खुलेआम विक्री होत होती. गेल्या अनेक वर्षांपासून हा अवैध धंदा सुरू होता. वारंवार तक्रार करूनही याकडे पोलिस दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. याठिकाणी अनेक दारुच्या मोकळ्या व भरलेल्या बाटल्या व गांजाच्या पुड्या आढळून आल्या. मात्र दरम्यान आरोपी फरार झाला होता. यावेळी महिलांनी संताप व्यक्त करीत आक्रमक पवित्रा घेत फरार झालेल्या आरोपीस पोलिस जोपर्यंत अटक करीत नाही तोपर्यंत त्याठिकाणी ठिय्या मारला. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी ठिय्या आंदोलन माघार घेतले.

गावात दारूबंदीसाठी पुढाकार

दारुमुळे संसार उद्धवस्त होत असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी गावात दारूबंदी असावी, यासाठी पुढाकार घेत आक्रमक पवित्रा घेत येथील अवैध दारू विक्री अड्डा उध्वस्त केला. त्यामुळे या रणरागिनींचे परिसरातून कौतुक होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.