Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीच्या वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये भरती; मिळणार १ लाखांहून अधिक पगार




वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, सांगली येथील कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागामधील विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.


सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. सदर या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवरांची निवड थेट मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीकरिता दिलेल्या पत्यावर ०१ जानेवारी २०२४ रोजी हजर रहायचे आहे.

वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, सांगलीच्या कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाच्या  मधील विविध जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे.

पदभरतीचा तपशील :

संस्था : वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, 

भरली जाणारी पदे : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक
नोकरी ठिकाण : सांगली

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखती विषयी :

मुलाखतीची तारीख : ०१ जानेवारी २०२४, सकाळी १० वाजल्यापासून
मुलाखतीचा पत्ता : वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, सांगली
कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभाग

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, सांगलीच्या कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी मुलाखतीला येणार्‍या उमेदवारांकडे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, DTE (GOM) आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी नमूद केल्यानुसार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असावा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.