Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चप्पल नेमकी कुणी भिरकावली? गोपीचंद पडळकर यांचा कुणावर निशाणा?

चप्पल नेमकी कुणी भिरकावली? गोपीचंद पडळकर यांचा कुणावर निशाणा?

पुणे : पुण्यातील इंदापूरमध्ये काल ओबीसी मेळावा पार पडला. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल भिरकावण्यात आली. या घटनेचे आता सर्वत्र पडसाद उमटू लागले आहेत. धनगर समाजाकडून ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. जालन्यात धनगर समाजाकडून रस्त्यावर टायर जाळत या चप्पलफेकीचा निषेध करण्यात आला. तर गोपीचंद पडळकर यांनीही आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी या सगळ्या प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.


गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या चप्पल फेकीच्या निषेधार्थ जालन्यातील शिरनेरमधील अंबड पैठण महामार्गावर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अंबड पैठण महामार्गावरील शिरनेर इथं धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी घोषणाबाजी करत टायर जाळून निषेध केला सकाळी 8 वा झालेल्या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाली होती. गोपीचंद पडळकर यांना टार्गेट केल्यास धनगर समाज शांत बसणार नसल्याचा ईशारा यावेळी आंदोलकांनी यावेळी दिला आहे.


गोपीचंद पडळकर पडळकर काय म्हणाले?

ओबीसी समाज अत्यंत सयंमाने शांततेत ओबीसी एल्गार मेळ्याव्यामध्ये आपल्या स्वतःच्या हक्काच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडतोय. काल इंदापूरची सभा संपल्यानंतर शेतकऱ्यांना दुधाचे दर मिळाला पाहिजे. या सुरु असलेल्या आंदोलनास मी जात असताना नौटंकीचा हा प्रकार घडला. नंतर या भेकडांनी परत नौटंकीबाजी करत मीडियात मुलाखती दिल्या आणि म्हणतात सदर घटना माझ्याच कार्यकर्त्यांनी केली… खरोखर मला यांची कीव वाटते, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.