Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ॲड. अमित शिंदे यांची राष्ट्रवादी कॅांग्रेसच्या युवक जिल्हाध्यक्षपदी निवड

ॲड. अमित शिंदे यांची राष्ट्रवादी कॅांग्रेसच्या युवक जिल्हाध्यक्षपदी निवड


सांगली दिः राष्ट्रवादी कॅांग्रेस च्या अजित पवार गटाच्या सांगलीच्या युवक शहर जिल्हाध्यक्षपदी ॲड. अमित शिंदे यांची निवड झाली.

मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिल तटकरे, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे सर तसेच अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष मा. इद्रिसभाई नाईकवडी यांच्या उपस्थितीत ॲड. अमित शिंदे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. सांगली जिल्हा सुधार समितीची स्थापणा करून अमित शिंदे यांनी नागरी प्रश्नांवर चांगलेच रान उठवले होते. महापालिका निवडणुकीमध्ये देखील त्यांनी पॅनेल उभा करून लढत दिली होती. कारखानाच्या राखेपासून ते रस्त्यांच्या भ्रष्टाचारापर्यंत अनेक प्रश्नांवर आवाज उठवत प्रश्न तडीला लावणार्या ॲड. अमित शिंदे यांनी महापालिका क्षेत्रामध्ये तरूणांचे संघटन देखील उभे केलेले आहे. सामाजिक राजकीय प्रश्नांच्या माध्यमातून चर्चेत आलेल्या अमित शिंदे यांनी मा. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षात प्रवेश केला होता. परंतु चळवळींच्या माध्यमातून राजकारणात आलेल्या अमित शिंदे यांनी स्थानिक राजकारणाला कंटाळून जयंत पाटील यांची साथ सोडत अजितदादा व प्रा. पद्माकर जगदाळे गटांसोबत राहणे पसंत केले आहे. त्यांच्या माध्यामातून सुशिक्षित तरूणांची मोठी फळी पक्षाला मिळालेली आहे. 

मुंबई येथे पक्षाच्या झालेला युवक राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीमधे ॲड. अमित शिंदेची निवड करण्यात आली. यावेळी छ. शिवाजी महाराज, फुले-शाहू- आंबेडकर यांच्या विचारांनेच पक्षामध्ये कार्यरत राहणार असून बूथनिहाय युवकांचे संघटन करत नागरी प्रश्न सोडविण्यासाठी भर देणार असल्याचे ॲड. अमित शिंदे यांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.