Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जगातील सर्वात महागडा किडा, राहतो कचऱ्यात! पण सापडला तर बनवेल करोडपती..

जगातील सर्वात महागडा किडा, राहतो कचऱ्यात! पण सापडला तर बनवेल करोडपती..

मुंबई : जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपण जाणतो पण त्याची किंमत आपण ओळखत नाही. त्याचबरोबर या पृथ्वीतलावर असे काही जीव आहेत, जे तुमच्या हाती लागले तर समजा तुमचे नशीब उघडले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कीटकाबद्दल सांगणार आहोत, जो जगातील सर्वात महागडा कीटक आहे. त्याची किंमत एवढी आहे की, हा कीडा विकून तुम्ही ऑडी आणि बीएमडब्ल्यू सारख्या गाड्या सहज खरेदी करू शकता. या कीटकाबद्दल जाणून घेऊया.

हा कीटक काही वर्षांपूर्वी एका जपानी ब्रीडरने $89,000 (सुमारे 74.25 लाख रुपये) मध्ये विकला होता. असे म्हटले जाते की, हा पृथ्वीवरील सर्वात लहान, विचित्र आणि दुर्मिळ प्रजातींपैकी एक आहे. स्टॅग बीटल असे या किडीचे नाव असून तो लुकॅनिडे कुटुंबातील आहे. या कीटकांच्या एकूण 1200 प्रजाती जगभरात आढळतात.


हा महागडा किडा राहतो कचऱ्यात..

स्टॅग बीटल नावाचा हा किडा खूप महाग असला तरी तो कचऱ्यात सापडतो. त्याच्या अळ्या कुजलेले लाकूड खातात. हे कीटक कचऱ्यात आढळतात. कारण त्यांना कोरड्या आणि कुजलेल्या लाकडात राहायला आवडते. त्यांचे वय सुमारे 7 वर्षे असते आणि ते फळांचा रस, झाडाचा रस आणि पाण्यावर जगतात. ते घन लाकूड खाऊ शकत नाहीत. त्यांना ओळखण्यासाठी, आपण पाहू शकता की, त्यांच्या डोक्यावर काळी शिंगे आहेत, जी 5 इंच लांब आहेत. हे फक्त गरम ठिकाणीच आढळतात.


अत्यंत थंडी सहन होत नाही

लाखात विकला जाणारा हा किडा इतका नाजूक आहे की, त्याला प्रचंड थंडी सहन होत नाही. हिवाळ्याच्या काळात कीटक स्वतःचे संरक्षण करू शकला नाही तर तो मरतो. जेव्हा दोन स्टॅग बीटल लढतात तेव्हा ते सुमो पैलवानांप्रमाणे एकमेकांना मागे ढकलतात. या किड्याचा उपयोग असाध्य रोगांवर औषधे बनवण्यासाठी केला जात असल्याने त्याची किंमत इतकी जास्त आहे. मात्र, या प्रजातीसाठी नामशेष होण्याचा धोकाही वाढत आहे.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. सांगली दर्पण यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.