Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महादेव बॅटिंग अॅपचा मालक रवी उप्पलला दुबईत अटक

महादेव बॅटिंग अॅपचा मालक रवी उप्पलला दुबईत अटक


महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपचा सह-संस्थापक रवी उप्पल याला संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधून अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर हिंदुस्थानी एजन्सी यूएई अधिकाऱयांच्या संपर्कात आहे. ईडीच्या विनंतीवरून इंटरपोलने रवी उप्पलविरोधात रेड कॉर्नर नोटीस आधीच बजावली होती. त्यानंतर आज ही कारवाई करण्यात आली आहे.


भारतीय एजन्सीच्या सूचनेनुसार, ही कारवाई करण्यात आली. रवी उप्पलच्या अटकेनंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरलाही लवकरच अटक केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. छत्तीसगड आणि मुंबई पोलिसांव्यतिरिक्त कथित बेकायदेशीर सट्टेबाजांशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणात रवी उप्पलची ईडीकडून चौकशी केली जात आहे. महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपप्रकरणी ईडीने दोन महिन्यांत मुंबई, कोलकाता आणि भोपाळमधील 39 ठिकाणी छापे मारून 417 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. तसेच महिन्याभरापूर्वी पेंद्र सरकारने महादेव बेटिंग अॅपसह 22 बेकायदेशीर बेटिंग अॅप्स आणि वेबसाईट्स ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत.

 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.