Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वायु प्रदूषणाने दरवर्षी २१ लाख भारतीयांचा मृत्यू! नव्या संशोधनातील निष्कर्ष

वायु प्रदूषणाने दरवर्षी २१ लाख भारतीयांचा मृत्यू! नव्या संशोधनातील निष्कर्ष

नवी दिल्ली:  वायू प्रदूषणामुळेभारतात दरवर्षी सुमारे २१.८ लाख मृत्यू होत असल्याचा धक्कादायक दावा 'द बीएमजी' नियतकालिकात प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात करण्यात आला आहे. प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.

'ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज-२०१९'च्या अभ्यासातील डेटा, नासा उपग्रह-आधारित सूक्ष्म कण आणि लोकसंख्या डेटा आणि वातावरणातील रसायनशास्त्र, एरोसोल आणि संबंधित जोखीम, आदींचा वापर करून त्यांनी अतिरिक्त मृत्यूंचे विश्लेषण केले. संशोधनानुसार, २०१९ मध्ये जगभरात ८३ लाख मृत्यू हवेतील सूक्ष्म कण (पीए २.५) आणि ओझोन (ओ-३) मुळे होते, त्यापैकी ६१ टक्के (५१ लाख) जीवाश्म इंधनाशी संबंधित होते. सभोवतालच्या वायू प्रदूषणाच्या सर्व स्रोतांमुळे होणारे मृत्यू दक्षिण आणि पूर्व आशियामध्ये सर्वाधिक होते.


प्रदूषणामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण

हृदयरोग - ३०%

स्ट्रोक - १६%

फुप्फुसाचा

जुनाट आजार - १६%

मधुमेह - ६%

उच्च रक्तदाब, अल्झायमर, पार्किन्सन - २०%

चीनमध्ये दरवर्षी २४.४ लाख, भारतात २१.८ लाख मृत्यू झाले.

 

...तर मृत्यू टाळता येतील

उद्योग, वीज निर्मिती आणि वाहतूक यामध्ये जीवाश्म इंधनाचा वापर केल्यामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे जगभरात दरवर्षी ५.१ दशलक्ष अतिरिक्त मृत्यू होतात. स्वच्छ, नूतनीकरणक्षम ऊर्जेच्या वापराने टाळले जाऊ शकतात. जीवाश्म इंधन टप्प्याटप्प्याने बंद केल्याने पूर्वीपेक्षाही अधिक परिणामकारक फायदे होऊ शकतो.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.