खासदाराच्या कंपनीवर धाड, सापडलं मोठं घबाड; नोटा मोजणाऱ्या मशिन्सही पडल्या बंद
भुवनेश्वर: ओडिशातील आयकर विभागाने दारुच्या व्यवसायाशी निगडीत एका कंपनीच्या आणि तिच्याशी संबंधित इतर तीन उद्योग समुहाच्या ठिकाणांवर बुधवारी छापेमारी केली. या कंपन्या राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याशी संबंधित आहेत, ते काँग्रेसचे राज्यसभा खासदार आहेत. आयकर अधिकाऱ्यांनी सकाळी ७ वाजताच ओडिशातील ४ आणि झारखंडमधील २ ठिकणांवर धाड टाकली. त्यानंतर, घटनास्थळावर कारवाई सुरू करण्यात आली असून मोठी रोकड जप्तही करण्यात आली आहे. याप्रकरणी, विभागाने अधिकृत माहिती दिली असून आत्तापर्यंत ५० कोटी रुपयांच्या नोटींची मोजणी पूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलंय.
आयकर (आय-टी) विभागाने ओडिशा आणि झारखंडमधील बौध डिस्टीलरीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर छापा टाकला असून कालपर्यंत कंपनीशी संबंधित कार्यालयातून चलनी नोटांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. आयटी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ओडिशातील बोलंगीर आणि संबलपूर व झारखंडमधील रांची, लोहरदगा येथे शोधमोहीम सुरू आहेत. आत्तापर्यंत ५० कोटी रुपयांपर्यंतच्या नोटांची मोजणी पूर्ण झालीअसून नोटांची संख्या अधिक आहे. मात्र, नोटा मोजणाऱ्या मशीन्सही बंद झाल्याने नोटा मोजायचं काम सध्या थांबवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.