Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जयंत पाटलांच्या कारखान्यावर धडकले स्वाभिमानीचे कार्यकर्ते, ऊस गाळपसाठीच्या गव्हाणीत मारल्या उड्या

जयंत पाटलांच्या कारखान्यावर धडकले स्वाभिमानीचे कार्यकर्ते, ऊस गाळपसाठीच्या गव्हाणीत मारल्या उड्या


सांगली जिल्ह्यातील ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना  आक्रमक झाली आहे. इस्लामपूरच्या साखराळे येथील राजारामबापू साखर कारखान्यामध्ये आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते घुसत उसाच्या गाळपसाठी असणाऱ्या गव्हाणीत थेट उड्या मारल्या. या कारखानाचा ऊस काटा बंद पाडण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. 

उसाला पहिली उचल एफआरपी जाहीर करावी आणि प्लस 100 रुपये देण्यात यावे. कोल्हापूर जिल्हाने जो निर्णय जाहीर केला आहे तो सांगली जिल्ह्यात राबवावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.

आजपासून (शुक्रवार) सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यावर कार्यकर्ते आंदोलन करीत आहेत. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या इस्लामपूर साखर कारखान्यासमोर काटा बंद आंदोलन करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी नमूद केले हाेते. या आंदोलनात स्वतः हा राजू शेट्टी  सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.

इस्लामपूर साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते काटा बंद करण्यासाठी साखर कारखान्याच्या परिसरात घुसले. या ठिकाणी साखर कारखान्याचा आतील ऊस काटा बंद पाडण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.

पोलीसांनी या ठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीसांचा दबाव झुगारून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या आत घुसून उसाचा गाळप बंद पाडण्यासाठी उसाच्या गव्हाणीत थेट उड्या देखील मारल्या. यामुळे कारखाना परिसरात तणाव निर्माण झाला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.