Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'मी अजूनही जिवंत आहे', निधनाच्या अफवांनंतर साजिद खानने सांगितलं सत्य




एकाच नावाच्या जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर बऱ्याचदा मोठा गोंधळ उडतो. अशावेळी मृत व्यक्तीऐवजी दुसऱ्या जिवंत असलेल्या व्यक्तीचाच मृत्यू झाल्याचे अनेकांना वाटते.

अशावेळी त्या व्यक्तीच्या घरी फोन करून त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले जाते. त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत श्रद्धांजली दिली जाते.
असाच काहिसा प्रकार बॉलिवूडचा  सुप्रसिद्ध दिग्दर्शक साजित खानसोबत घडला आहे. साजिद खानचे निधन झाले असं समजून अनेकांनी त्याच्या घरी फोन करून सांत्वन केले. यावेळी साजिद खानला मी अजूनही जिवंत आहे असे सांगावे लागले. यासंदर्भात साजिद खानने सोशल मीडियावर  एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो व्हायरल होत आहे.
मेहबूब खान यांच्या 'मदर इंडिया' या चित्रपटात सुनील दत्तच्या बिरजूची बालपणाची भूमिका साकारणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते साजिद खान यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर अनेकांना वाटले की चित्रपट दिग्दर्शक साजिद खान यांचे निधन झाले आणि ते त्यांच्या घरी फोन करू लागले. सतत येणाऱ्या फोनमुळे साजिद खान त्रस्त झाला. शेवटी त्याने एक व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर टाकला आणि जिवंत असल्याचा खुलासा केला.
दिग्दर्शक साजिद खानने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो पांढऱ्या रंगाच्या चादरीत गुंडाळलेला दिसत आहे आणि हळूहळू तो आपल्या चेहऱ्यावरील चादर बाजूला काढण्याचा प्रयत्न करतो. 'मी भूत आहे. साजिद खानचा भूत आहे. तुम्हाला खाऊन जाईल. माझ्या आत्म्याला शांती मिळत नाही. पण मला शांती कशी मिळेल.', असं म्हणत तो चेहऱ्यावरील चादर काढून टाकतो. पुढे म्हणतो की, 'तो बिचारा 1957 मध्ये आलेल्या 'मदर इंडिया' चित्रपटामध्ये साजिद खान होता. या चित्रपटामध्ये सुनील दत्तची लहानपणाची भूमिका साकारलेला तो छोटा मुलगा साजिद खान होता.'
'त्यांचा जन्म 1951 मध्ये झाला होता. त्यांच्यानंतर मी 20 वर्षांनी जन्माला आलो. त्यांचा मृत्यू झाला असून देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो, परंतु काही बेजबाबदार मीडियावाल्यांनी माझा फोटो पोस्ट केला. काल रात्रीपासून आतापर्यंत मला अनेकांचे फोन येत आहेत. ते मला तुम्ही जिवंत आहात का? असे विचारत आहे. अनेकांकडून RIP मेसेज येत आहेत.' या व्हिडिओमध्ये साजिद खानने पुढे सांगितले की, 'मी जिवंत आहे, मला अजूनही तुमचे मनोरंजन करायचे आहे.'

दरम्यान, 'मदर इंडिया' चित्रपटात काम केलेले अभिनेते साजिद खान काही वर्षांपासून कॅन्सरशी लढा देत होते. 22 डिसेंबर रोजी त्यांची कॅन्सरविरोधातील लढाई संपली. 22 डिसेंबरला त्यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या ७० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. 'माया' आणि 'द सिंगिंग फिलिपिना' यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्समध्येही त्यांनी काम केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.