Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संतापजनक.! भाजप नेत्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; भाजपच्या राज्यात मुली सुरक्षित आहेत का?

संतापजनक.! भाजप नेत्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; भाजपच्या राज्यात मुली सुरक्षित आहेत का?


नवी दिल्ली : देशात मागील काही वर्षापासून महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसत आहेत. विशेष करून लोकप्रतिनीधींवर याप्रकरणातील गुन्हांमधील प्रकरण उजेडात आलेली आहेत. यातच उतराखंड राज्यातील मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या मतदारसंघातील भाजप नेत्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपच्या राज्यात स्वत:च भाजपचे नेते मुलींना भक्षक बनवत आहेत की काय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

पीडित मुलीच्या आईनं पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत भाजप नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. पीडित आल्याच्या तक्रारीनंतर उत्तराखंडमधील चंपावत जिल्ह्यात ही घटना घडली असून मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या मतदारसंघातील कमल रावत या भाजप नेत्याने अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला आहे. त्यावरून पीडीत मुलीच्या आईने बलात्कारासह विविध कमलाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पोलीस अधिक्षक देवेंद्र पिंचा यांनी दिलेल्या माहितीनुसार कलम ३७६ बलात्कार, ५०६ जाणूनबूजून अपमानित करणे, ५०६ धमकी आणि पोस्को अतंर्गत कमल रावतवर गुन्हा दाखल केला आहे. पीडीत मुलीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर न्यायालयात जबाब नोंदवण्यात येईल. यातच कमल रावतने मुलीवर बलात्कार केला आहे. याची माहिती कुणाला दिल्यास जीवे मारण्याची धमकी कमल रावतने दिली होती. असं पीडीत आईच्या मुलीने सांगितलंय.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.