Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दुचाकी चोरणाऱ्या तरूणाला अटक, ६ दुचाकी जप्त दोन लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई

दुचाकी चोरणाऱ्या तरूणाला अटक, ६ दुचाकी जप्त दोन लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई


सांगली :  सांगली शहर परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या तरूणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्याच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. 

संतोष मारूती हाके (वय १९, रा. बागेवाडी, ता. जत) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शहरात दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने त्याला आळा घालण्यासाठी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक निरीक्षक शिंदे यांनी तयार केले होते. या पथकाला दुचाकी चोरट्यांना अटक करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. 

पथक मिरज परिसरात गस्त घालत असताना तानंग फाटा येथील पुलाजवळ एक तरूण चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तानंग फाटा परिसरात सापळा रचला होता. त्यावेळी एक तरूण तेथे संशयास्पदरित्या थांबल्याचे पथकाला आढळले. पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केली. त्यावेळी त्याने त्याचा सांगलीतील मित्र महमद शेख याने सांगलीतून ती चोरल्याचे सांगितले. तसेच अन्य काही चोरीच्या दुचाकी विक्रीला दिल्याचे तसेच काही दुचाकी त्याच्या घराजवळ असल्याची कबुली दिली. नंतर पथकाने हाके याला घेऊन शेख याच्या घरी छापा टाकून सहा दुचाकी जप्त केल्या. त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, अरूण पाटील, प्रकाश पाटील, अभिजित ठाणेकर, सुनील जाधव, रोहन घस्ते, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.