Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बेघर केंद्रातील वेगळे आदर्श विवाह बंधन: आयुक्त सुनील पवार

बेघर केंद्रातील वेगळे आदर्श विवाह बंधन: आयुक्त सुनील पवार


मिरज : येथील आस्था बेघर महिला केंद्राची  मानसकन्या उषा हजारे हिचा विवाह राजेश पवार यांच्या सोबत न्यू इंग्लिश स्कूल येथे संपन्न झाला. सांगली, मिरज कुपवाड शहर महानगरपालिका दी.अं.यो.राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या, आस्था बेघर महिला निवारा केंद्रात एक आगळावेगळा विवाह संपन्न झाला.

कन्यादान करण्याकरिता महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार उपस्थित होते. 'बेघर केंद्रातील मुली बरोबर विवाह झाला" म्हणजे आम्हाला विचारणारे कोणी नाही, असे कोणी समजू नये. त्यांच्यासोबत महानगरपालिका खंबीरपणे पाठीशी उभी आहे. संकटग्रस्त महिलांना स्वावलंबी बनवणे हेच केंद्राचे उद्दिष्ट आहे! असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. यावेळी बेघर केंद्राच्या वतीने ज्येष्ठांचा विवाह व पुनर्विवाह झालेल्या दाम्पत्यांचा, तसेच वराच्या आई-वडिलांचा  सत्कार आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आयुक्त पवार यांच्यासोबत वधूवरांची वाजंत्री सह वरात काढण्यात आली. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, जयश्री मदन पाटील, पृथ्वीराज पाटील, माजी महापौर संगीता खोत, शांतिनिकेतनचे गौतम पाटील, माजी सभापती गीतांजली ढोपे पाटील, इंद्रजीत घाटे, सदाशिव मगदूम, महेंद्र गाडे, आयुब इनामदार, जहीर मुजावर, रेखा पाटील, सुचित्रा पवार, परशुराम कुंडले, राजेश साळुंखे सह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. प्रस्ताविक प्रकल्प व्यवस्थापक ज्योती सरवदे व स्वागत केंद्र संचालिका  सुरेखा शाहीन शेख यांनी केले. आभार प्रकल्प व्यवस्थापक मतीन अमीन यांनी मानले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.