Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भीषण अपघातात अनेकांचा मृत्यू

भीषण अपघातात अनेकांचा मृत्यू

सोलापूर : राज्यातील भीषण अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. गोंदिया जवळ लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्यांच्या गाडीला अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झालेत. ही दुर्दैवी घटना ताजी असतानाच आता देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामध्ये कार आणि कंटेनरचा भीषण अपघात होऊन चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झालेत. जखमी प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शिर्डीच्या दिशेने निघाले होते भाविक

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकमधील गुलबर्गा येथून काही भाविक शिर्डीच्या दिसेने निघाले होते. देवदर्शनासाठी जात असतानाचा हा भीषण अपघात घडला आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील परांडा-करमाळा राज्यमार्गावर पांडे गावाजवळ हा भीषण अपघात झाला. कार आणि कंटेनरची जोरदार धडक झाली.त्यामध्ये चौघा जणांना जीव गमवावा लागला तर सहा जण गंभीर जखमी झाले. श्रीशैल चांदेगा कुंभार (वय 55), शशिकला श्रीशैल कुंभार (वय 50), ज्येमी दीपक हुनशामठ (38 रा. गुलबर्गा) आणि शारदा हिरेमठ (वय 67, रा. हुबळी) अशी मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर सहा जखमींवर जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


जळगावातील अमळनेरात उभ्या कारचा स्फोट ; आगीत संपूर्ण कार खाक

दरम्यान जळगाव येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळवातील अमळनेर शहरात उभ्या असलेल्या एका कारचा अचानक स्फोट होऊन आग लागल्याने कारमध्ये झोपलेले दोघे जण जखमी झाले. जखमी दोघे हे पिता पुत्र असून ते राजस्थानमधील विक्रेते असल्याचे समजते.

राजस्थानमधील ओटा बुंदीया जिल्ह्यातील खेळणी व संसारोपयोगी साहित्य विक्रेत्यांनी अमळनेर शहराबाहेर आपले बस्तान मांडले आहे. त्यांची वस्तू वाहणारी ओम्नी गाडी त्यांच्या झोपडीशेजारी लावलेली होती. कर्नल बागडीया (वय ६०) हे गाडीमध्ये रात्री झोपलेले होते. अचानक स्फोट होऊन गाडीला आग लागली. या आगीत ते आणि त्यांचा तरुण मुलगा रामलाल हे जखमी झाले. आग लागताच नगर परिषदेचा अग्निशमन बंब बोलावण्यात आला आणि आग विझवण्यात आली. तोपर्यंत गाडीच्या टायरसह पूर्ण वाहन जळून खाक झाले होते. दोघांची प्रकृती बरी आहे. मात्र हा स्फोट कशामुळे झाला हे मात्र समजू शकले नाही.

समृद्धी महामार्गावर कारचा अपघात, सात जखमी

दरम्यान समृद्धी महामार्गावर रोही आडवा आल्याने कारचा अपघात होऊन सात जण जखमी झाले. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील पोहाजवळ लोकेशन 190 वर हा अपघात झाला आहे. कारच्या समोर अचानक रोही आल्याने चालकाने तात्काळ ब्रेक मारला, पण त्यामुळे गाडीचे समोरील दोन्ही टायर फुटले आणि गाडी डिव्हायडर धडकली. यामध्ये गाडीतील सात प्रवासी जखमी झाले. सर्व जखमी हे चंद्रपूरचे राहणारे आहेत. ते शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन करून चंद्रपूरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.