आरबीआयचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, Bank खातेधारकांमध्ये भीतीचे वातावरण
आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार रिझर्व बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील एका बड्या बँकेचा परवाना रद्द करण्याची धडक कारवाई केली आहे. त्यामुळे सध्या बँक ग्राहकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. खरंतर गेल्या काही महिन्यांपासून रिझर्व बँक ऑफ इंडियाने नियमांची पायमल्ली करणाऱ्या बँकांवर मोठी कडक कारवाई केली आहे.
काही बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे तर काही बँकेचे यापूर्वी देखील परवाने रद्द करण्याचे निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून निर्गमित झाले आहेत.
दरम्यान काल अर्थातचं चार डिसेंबर 2023, वार सोमवारी रिझर्व बँक ऑफ इंडियाने शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेड, कोल्हापूर या बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोल्हापूर येथील या बँकेतील बँक खातेधारकांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत असून बँक ग्राहकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण आहे. बँकेचा परवाना रद्द झाला आहे आता आपल्या पैशांचे काय होणार ? हा मोठा प्रश्न आहे. जर तुमचेही या बँकेत अकाउंट असेल आणि तुम्हाला देखील हीच चिंता लागून असेल तर चिंता करू नका याबाबत रिझर्व बँक ऑफ इंडियाने सविस्तर अशी माहिती दिली आहे.
आरबीआयने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, या सहकारी बँकेकडे बँकिंग सेवा देण्यासाठी पुरेसे भांडवल नाही. अशा परिस्थितीत आरबीआयच्या नियमांचे पालन होत नसल्याने आणि ग्राहकांचे हित लक्षात घेऊन आरबीआयने बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या बँकेचे सर्व व्यवहार 4 डिसेंबर 2023 पासून बंद राहणार आहेत. यां बँकेला आता कोणत्याच प्रकारची बँकिंग सेवा देता येणार नाही. या बँकेत आता खातेधारकांना ठेवी ठेवता येणार नाहीत.
पण या बँकेतील ग्राहकांना DICGC रिझर्व बँक ऑफ इंडिया चे उप कंपनीकडून पाच लाख रुपयांपर्यंतचा विम्याचा लाभ मिळणार आहे. म्हणजे ज्या ग्राहकांनी पाच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम बँकेत गुंतवलेली असेल तर त्यांना शंभर टक्के रक्कम परत मिळणार आहे. मात्र ज्या ग्राहकांनी यापेक्षा अधिक रक्कम गुंतवलेली असेल त्यांना पाच लाखांपर्यंतची रक्कम परत मिळू शकते असे सांगितले जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.