Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कुणीतरी दानपेटीत टाकले 8 लाखांचे शूज

कुणीतरी दानपेटीत टाकले 8 लाखांचे शूज


जर तुम्ही एखाद्या दानपेटीत हात टाकला आणि अचानक तुमच्या हाताला एक चमकदार बुटांची जोडी लागला तर काय कराल? अशीच एक घटना यूएसच्या ओरेगनमधील बर्नसाइड शेल्टरमध्ये घडली. पण हे काही सामान्य शूज नव्हते ते स्पाइक ली साठी खास तयार करण्यात आलेले एअर जॉर्डन 3एस होते. 10,000 डॉलर ही काही कमी रक्कम नसते. भारतीय करन्सीनुसार, ही रक्कम 8,34,100 रुपये इतकी होते. तुम्हाला माहीत असायला पाहिजे की, हे खास शूज प्रसिद्ध डिझायनर टिंकर हेटफील्डने बनवले आहेत.


दानपेटीत कुणीतरी टाकले 8 लाखांचे शूज

दरम्यान हे शूज स्पाइक ली याने 2019 मध्ये ऑस्कर अवॉर्ड्समध्ये घातले होते. इतकंच नाहीतर टिंकर हेटफील्ड स्वत: शेल्टरमध्ये आला आणि शूजबाबत सांगितलं की, ते खरे आहेत. दान केलेले हे शूज विकण्याऐवजी ओरेगनच्या शेल्टरने एक चांगलं काम केलं. त्यांनी या शूजचा लिलाव केला आणि त्यातून मिळालेल्या पैशातून गरजू लोकांची मदत करण्याचा निर्णय घेतला. या शूजला आधीच चांगली किंमत मिळत आहे. त्यांना अंदाज आहे की, याला 20,000 डॉलर म्हणजे 16 लाख रूपयांपेक्षा जास्त किंमत मिळावी.


माहीत नाही कुणी ठेवले शूज

हे मौल्यवान शूज दानपेटीत कसे पोहोचले हे तर अजून समजू शकलेलं नाही. पण एक बाब नक्की आहे की, यांमुळे गरजू लोकांना खूप मोठी मदत झाली आहे. 18 डिसेंबरला या शूजचा लिलाव केला जाणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.