Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रवासी बोट समुद्रात बुडाली, भीषण दुर्घटनेत 61 जणांचा मृत्यू

प्रवासी बोट समुद्रात बुडाली, भीषण दुर्घटनेत 61 जणांचा मृत्यू


लिबिया : लिबियाच्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना घडली असून प्रवाशांनी भरलेली बोट बुडाली आहे. लिबियातील आंतरराष्ट्रीय प्रवासी संघटनेने शनिवारी याची माहिती देताना सांगितलं की, एक दुर्दैवी आणि दु:खद जहाज दुर्घटनेत महिला आणि मुलांसह किमान ६१ जणांचा मृत्यू झाला. जहाजातून ८६जण प्रवास करत होते अशी माहिती समोर येत आहे.

न्यूज संस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, आयएमओने जिवंत वाचलेल्या लोकांच्या हवाल्याने म्हटलं की, जवळपास ८६ जणांना घेऊन नाव लिबियाच्या जवारा शहरातून रवाना झाली होती. लिबियात २०११ मध्ये नाटो समर्थित विद्रोहानंतर अस्थिरतेचं वातावरण आहे. तसंच सुरक्षेची वानवा आहे. समुद्राच्या मार्गाने युरोपला जाणाऱ्या लोकांसाठी हा एक प्रमुख लाँचिंग पॉइंट आहे. रिपोर्टमध्ये म्हटलं की, मानव तस्करी नेटवर्क प्रामुख्याने लष्करी गटांद्वारे चालवले जाते. किनारपट्टी भागावर यांचेच वर्चस्व असते.


काही महिन्यांपूर्वी लिबियात सुरक्षा दलांनी प्रवाशांवर कारवाई केली होती. अशाच एका घटनेत जून महिन्यात ७९ प्रवासी बुडाले होते तर शेकडो बेपत्ता झाले होते. नाव उलटल्याची आणि ग्रीसजवळ खोल समुद्रात बुडाल्याची शंका व्यक्त केली जात होती. अलिकडच्या काळात युरोपातील सर्वात भीषण बोट दुर्घटनांपैकी एक अशी ही दुर्घटना होती.

एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की बोट लिबियाहून रवाना झाली होती. शिपिंग मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली क, बोटीत बहुतांश लोक हे इजिप्त, सिरीय आणि पाकिस्तानचे होते. याआधी फेब्रुवारी महिन्यात एका वादळावेळी इटलीच्या कॅलाब्रियन किनारपट्टीवर लाकडी बोट खडकाला धडकून ९६ जण मृत्यूमुखी पडले होते.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.