Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दारू सोबत चुकूनही खाऊ नका 'हे' 5 पदार्थ, अन्यथा.......



दारूचे सेवन प्रत्येक दृष्टिकोनातून हानिकारक आहे. परंतू या गोष्टी माहित असून देखील बरेचजण दारूचे सेवन करतात. केवळ दारूचं नाही तर यासोबत काहीजण स्नॅक्सचे देखील सेवन करतात ज्याला चखना असे म्हणतात.


लोकांना दारू सोबत चवीला मसालेदार पदार्थ खायला आवडतात. पण अल्कोहोलसोबत असे काही पदार्थ खाल्ल्याने शरीरात पोषक तत्वे शोषली जात नाहीत आणि अॅसिड रिफ्लक्स तसेच ब्लोटिंग सारख्या समस्या वाढू लागतात. अल्कोहोल प्यायल्यानंतर शरीरात पाण्याची जास्त कमतरता जाणवते यामुळे डिहायड्रेशन होते. तर चखण्यासाठी वापरण्यात येणारे बहुतेक पदार्थ डिहायड्रेशनची समस्या वाढवतात. जास्त चरबीयुक्त, मसालेदार आणि खारट अन्नपदार्थांचे सतत सेवन केल्याने यकृत पोकळ होते आणि शरीराला अनेक रोग जडतात.
दारू पित असताना चुकीच्या पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. तेव्हा दारू पित असताना कोणत्या गोष्टीचे सेवन करू नये हे जाणून घेऊयात.
1. चणे आणि रेड वाईन : TOI च्या वृत्तानुसार, दारू पिताना काही लोक स्नॅक म्हणून चणे किंवा राजमाही खातात, परंतु असे केल्यास तुमची पचनशक्ती कमकुवत होऊ शकते. रेड वाईन, चणे इत्यादी एकत्र खाल्ल्यास ते नीट पचत नाही. रेड वाईनमध्ये टॅनिन असते चण्यामध्ये असलेल्या लोहाचे शोषण रोखते.

2. बीयर आणि ब्रेड : बिअर प्यायल्यानंतर गॅस आणि अपचनाचा त्रास होऊ द्यायचा नसेल तर बीअरसोबत ब्रेडचे सेवन करू नका. बिअर आणि ब्रेड या दोन्हीमध्ये भरपूर यीस्ट असते जे पोटात सहज पचत नाही. यामुळे कैंडिडा बॅक्टेरियाची वाढ होऊ शकते.
3. अल्कोहोलसोबत जास्त नमकीन /खारट खाणे टाळावे : बऱ्याचदा लोक चव आवडते म्हणून मसालेदार पदार्थ, भुजिया इत्यादी दारूसोबत खातात. फ्रेंच फ्राय, चीज, भुजिया इत्यादींमध्ये भरपूर सोडियम असलेले पदार्थ पचनसंस्थेसाठी चांगले नसतात. खूप खारट पदार्थांच्या सेवनामुळे जास्त तहान लागते, त्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या जाणवू शकते.

4. अल्कोहोल आणि चॉकलेट : अल्कोहोल आणि चॉकलेटचे एकत्र सेवन करू नये. चॉकलेटमध्ये कॅफिन असते ज्यामुळे गॅस्ट्रोची समस्या वाढ शकते.

5. अल्कोहोल आणि पिझ्झा : अल्कोहोल पोट लवकर रिकामे होण्यापासून थांबवते, ज्यामुळे पोटात ऍसिड रिफलेक्स सुरु होते. अशावेळी जर तुम्ही दारू सोबत पिझ्झा खात असाल तर पिझ्झाला लावण्यात आलेली टोमॅटोची चटणी देखील खाल्ली जाते, त्यामुळे पोटात गॅस होण्याची समस्या निर्माण होते.

अल्कोहोल सोबत काय खाऊ शकता?

जर तुम्हाला अल्कोहोल सोबत काही पदार्थ खायचे असतील तर तुम्ही त्याच्यासोबत स्नॅक्स म्हणून सॅलेड आणि बदाम खाऊ शकता. मात्र, या गोष्टींमध्ये मीठ जास्त नसावे याची दक्षता घ्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.