Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भररस्त्यात पत्नीला बेदम मारहाण, 500 कोटींचा घोटाळा. विवेक बिंद्रा वादाच्या भोवऱ्यात

भररस्त्यात पत्नीला बेदम मारहाण, 500 कोटींचा घोटाळा. विवेक बिंद्रा वादाच्या भोवऱ्यात

उद्योजक आणि मोटिव्हेशनल स्पिकर विवेक बिंद्रासध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एवढंच नाही तर, विवेक याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ देखील होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. विवेक बिंद्रा आणि वादांचं फार जुनं नातं आहे.

पण आता पत्नीला भररस्त्यात सर्वांसमोर बेदम मारहाण केल्यामुळे विवेक बिंद्रा चर्चेत आला आहे. पण त्याआधी 500 कोटी रुपयांचा घोटाला आणि इतर अनेक प्रकरणांमुळे विवेक बिंद्रा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. तर विवेक बिंद्रा आणि भूतकाळातील त्याच्या वादग्रस्त प्रकरणांबद्दल सविस्तर जाणून घेऊ.. लोकांना योग्य दिशा दाखवणाऱ्या विवेक बिंद्रा खऱ्या आयुष्यात कसा आहे.. याबद्दल देखील अनेक चर्चा रंगल्या आहे.

विवेक बिंद्रा याने केली पत्नीला मारहाण

विवेक बिंद्रा याने पत्नी यानिका हिला सर्वांसमोर मारहाण करत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत. यानिका हिचा भाऊ वैभव क्वात्रा याने पोलिसांत तक्रार दाखल केली. सध्या याप्रकरणा पोलीस चौकशी करत आहेत. रिपोर्टनुसार, विवेक बिंद्रा आणि यानिका यांचं लग्न 6 सप्टेंबर 2023 रोजी झालं होतं. लग्नानंतर काही तासांत विवेक बिंद्रा पत्नी यानिका हिला खोलीत घेऊन गेला आणि पत्नीसोबत गैरवर्तन केलं… असं दाखल केलेल्या तक्रारीत म्हणण्यात आलं आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांत लक्ष लागलं आहे.


विवेक बिंद्रा याच्या ‘स्कॅम रॅकेट’ चालवण्याचा आरोप

कौटुंबिक अत्याचाराव्यतिरिक्त बिंद्रा इतर वादग्रस्त प्रकरणांमध्ये देखील अडकला आहे. यूट्यूबर आणि मोटिव्हेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी याने विवेक याच्यावर स्कॅम रॅकेट चालवण्याचा आरोप केला होता. महेश्वरीने नुकताच ‘बिग स्कॅम एक्सपोज्ड’ नावाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. यामध्ये बिंद्रा मल्टी लेव्हल मार्केटिंग सारखा कोर्स चालवल्याचा आरोप करण्यात आला होता. हा एक प्रकारचा घोटाळा असल्याचा दावा करण्यात आला.

मल्टी लेव्हल मार्केटिंग हा एक प्रकारचा घोटाळा असल्याचा दावा देखील करण्यात आला. व्यवसाय कसा करायचा याचं मार्गदर्शन करण्याचा नावाखाली विवेक विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे आकारायचा. हा जवळपास 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचं देखील समोर आलं होत. पण विवेक बिंद्रा याने त्याच्यावर होत असलेले सर्व आरोप फेटाळले होते.

 

शीख समुदाय आणि डॉक्टरांशी संबंधित वाद

जून 2022 मध्ये शीख समुदायाने विवेक बिंद्रा याच्यावर निशाणा साधला होताय. गुरु गोविंद सिंग यांच्या अॅनिमेटेड चित्रणावर त्याला शिखांच्या तीव्र संतापाला सामोरं जावं लागलं होतं. तेव्हा विवेक बिंद्रा याने माफी मागावी… असा आवाज उठवल्यानंतर विवेक बिंद्रा याने माफी मागतली होती.

एवढंच नाही तर, आणखी एक प्रकरणामुळे विवेक बिंद्रा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. 2018 मध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) बिंद्राविरोधात गुन्हा दाखल केला होता. बिंद्राने ‘रिअॅलिटी ऑफ इंडियन मेडिकल सिस्टीम’ नावाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये डॉक्टरांच्या विरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप. या प्रकरणी बिंद्रा याच्याविरोधात 50 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला. पण तेव्पा विवेक विजयी झाला. कारण तेव्हा न्यायालयाने संबंधीत प्रकरणात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अधिक भर दिला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.