Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सनी देओल बेपत्ता; पठाणकोटमध्ये झळकले पोस्टर; शोधून देणाऱ्याला 50 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर

सनी देओल बेपत्ता; पठाणकोटमध्ये झळकले पोस्टर; शोधून देणाऱ्याला 50 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर


बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या 'गदर 2' या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने मोठी कमाई केली. या चित्रपटामुळे सनी देओल पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला. मात्र अभिनेत्यासह सनी देओल भाजपचा खासदार देखील आहे. सनी देओल लोकसभा निवडणुकीत गुरदासपूर-पठाणकोट मतदारसंघातून निवडून आला. मात्र, निवडून आल्यानंतर एकदाही तो मतदारसंघात दिसला नाही. त्यामुळे मतदारसंघातील लोक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. तो बेपत्ता असल्याचे पोस्टर पठाणकोटमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

पठाणकोट जिल्ह्यातील हलका भोआ येथील सरना बस स्थानकावर सनी देओल बेपत्ता असल्याचे पोस्टर लावण्यात आले आहे. पठाणकोटमध्ये लावण्यात आलेल्या या पोस्टरमध्ये सनीला शोधणाऱ्याला 50 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येणार असल्याकचे स्पष्ट केले आहे. याआधी देखील सनी देओल बेपत्ता झाल्याचे पोस्टर पठाणकोट आणि सुजानपूरमध्ये लावण्यात आले आहेत. पठाणकोटमध्ये सनीने काहीही विकास केला नसल्याचं नागरिकांचं मत आहे. या पोस्टरद्वारे आता पुन्हा एकदा तेथील नागरिकांनी सनीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.


दरम्यान, संसदेत गेल्यानंतर सनी देओल पुन्हा आपल्या लोकसभेकडे परतला नाही असा आरोप सनीवर करण्यात आला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सनीला कोणीही तिकीट देऊ नये असा प्रचार पठाणकोटमध्ये करण्यात येत आहे. त्याचे हे पोस्टर बसमधील लोकांमध्ये देखील वाटप करण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.