वादळग्रस्त तामीळनाडूसाठी केंद्राची 450 कोटींची मदत
मिचाँग चक्रीवादळाने वाताहत केलेल्या तामीळनाडूच्या मदतीसाठी दुसरा हप्ता म्हणून 450 कोटी रुपये देण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहखात्याला दिले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी पूरस्थितीची हवाई पाहणी केल्यावर मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्याशी चर्चा केली. चेन्नईतील रेल्वे सेवा पूर्वपदावर येऊ लागली असली तरी, अनेक भागांत मदत पोहचवण्यासाठी स्वयंसेवकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.