Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तब्बल 40 बोलेरो आणि 40 स्कॉर्पिओ, अजितदादांकडून पदाधिकाऱ्यांना न्यू इअर भेट !

तब्बल 40 बोलेरो आणि 40 स्कॉर्पिओ, अजितदादांकडून पदाधिकाऱ्यांना न्यू इअर भेट !


मुंबई  :लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशात सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चबांधणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगणार आहे. एकीकडे महायुतीने लोकसभेच्या 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही लोकसभेत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू केल्या आहेत. महायुतीतील अजित पवार गटाने एक पाऊल पुढे टाकत आपल्या पदाधिकाऱ्यांसाठी थेट वाहन वाटप करण्याचं ठरवलं आहे. आज अजित पवार गटाने दोन वाहनांचे टेस्टींग केलं. त्यामुळे कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस येणार आहेत.

अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांसाठी खुशखबर

अजित पवार गटाकडून आज टेस्ट ड्राईव्हसाठी दोन प्रकारच्या गाड्या मागवण्यात आल्या होत्या. यामध्ये दोन प्रकारच्या गाड्यांचा समावेश आहे. बलेरो गाडीची किंमत 16 लाख रूपये. एकुण 40 गाड्यांची किंमत 6 कोटी 40 लाख रूपये होते. तर स्कॉर्पिओ गाडीची किंमत 22 लाख रूपये आहे. एकुण 40 गाड्यांची किंमत 8 कोटी 80 लाख रूपये होते. या गाड्यांच्या वाटपामुळे आता अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचे सुगीचे दिवस आहेत, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

शिंदे-अजित पवार गटात जागावाटपसाठी रस्सीखेच

सत्ताधारी शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात लोकसभा निडणुकीच्या जागावाटपावरुन रस्सीखेच सुरू झाल्याची चर्चा आहे. सध्या अजित पवार गटाचे 4 खासदार आहेत. तर शिंदे गटाचे 13 खासदार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या जानेवारी महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची जागावाटपासाठीची बैठक होणार आहे. लोकसभा बरोबरच विधानसभा निवडणुकीतही अजित पवार गट समसमान जागावाटपासाठी आग्रही आहे, अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत होते. त्यामुळे आता जागावाटप कसं होणार? कोण एक पाऊल मागे घेणार? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.