Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नागपुरात फुगे फुगवणाऱ्या सिलेंडरचा भीषण स्फोट, 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

नागपुरात फुगे फुगवणाऱ्या सिलेंडरचा भीषण स्फोट, 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

नागपुरात बिशप कॉटन स्कूल समोर मैदानात फुगे फुगवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या भीषण स्फोटात 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच 2 महिला जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागपुरातील बिशप ग्राऊंड लगतच्या रोडवर ही घटना घडली. फुगे फुगवणाऱ्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने सिलेंडर हवेत उडाला. हा स्फोट एवढा भीषण होता की त्यात 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. सिझन शेख असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे, तर फारिया शेख, अनमता शेख या दोघी जखमी झाल्या आहेत. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरमधील जुन्या व्हीसीएग्राऊंड परिसरात गॅसवरीस फुगे विकणारा व्यक्ती आला होता. त्याच्याकडे फुगे पाहून मृत सिझानने फुगा घेणाचा हट्ट केला. तो फुगेवाल्याकडे गेला तेव्हा फुगा फुगवताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट झाल्यानंतर मोठा आवाज झाला, त्यामुळे आजूबाजूचे लोक लोकं धावत घटनास्थळी आले. परंतु तोपर्यंत चिमुकल्या सिझानचा मृत्यू झाला होता. यानतंर जखमींना शहरातील मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.


दरम्यान फुगेवाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. हा फुगेवाला नागपूर शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गॅसवरचे फुगे विकत होता. तो रविवारी जुन्या व्हीसीएग्राऊंड परिसरात या भागात फुगे विकण्यासाठी येत होता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या स्फोटामध्ये फुगेवाला जखमी झालेला नाही. परंतु तो कोण होता आणि त्याचे नाव काय हे अजून समोर आले नाही.

लातूरमध्येही घडली अशीच घटना

दरम्यान लातूर शहरातील तावरजा कॉलनी भागात देखील फुगे फुगवणाऱ्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने लहान मुले जखमी झाली होती. या घटनेत फुग्यात हवा भरणाऱ्या गॅसचा स्फोट झाल्याने एकाचा मृत्यू झाला असून 7 लहान मुलं गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरु आहेत. त्यानतंर नागपूरमध्येही अशीच घटना घडल्याने. फुगेवाल्यांकडे असलेल्या गॅस सिलेंडरच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.