Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

3 राज्याच्या निकालावर आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची प्रतिक्रिया; व्हिडिओ पहा

3 राज्याच्या निकालावर आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची प्रतिक्रिया; व्हिडिओ पहा

"तीन राज्यातील निकालाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्‍वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. हा निकाल म्हणजे भ्रष्ट्राचारमुक्त सर्वांगिण विकासाच्या संकल्पनेला जनतेने समर्थन मिळाल्याचे द्योतक आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या महत्वाच्या राज्यातील निकालाने देशातील मतदारांचा कौल स्पष्ट झाला आहे. तेलंगणा मध्येही चांगल यश मिळालं आहे.

मला खात्री आहे की तेलंगणातही आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा क्रमांक एक चा पक्ष होईल.  मी स्वतः मध्यप्रदेश राज्यातील भोपाळ दक्षिण पश्चिम या अत्यंत प्रतिष्ठेच्या मतदारसंघात प्रचारासाठी आठ दिवस तळ ठोकून होतो. कठीण वाटणाऱ्या या मतदारसंघात भाजपचे भगवानदास सबनानी यांनी कमळ फुलवले. संघटनेच्या विविध पदांवर दोन तपांहून अधिक काळ काम केलेल्या भगवानदास सबनानी यांच्या विजयासाठी हातभार लावू शकलो, याचे समाधान आहे. मोदींचा हा करिश्मा राज्यातील आगामी सर्वच निवडणुकांत दिसेल."

- आमदार सुधीर गाडगीळ, सांगली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.