Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजप आमदाराला 25 वर्षांची शिक्षा, 10 लाखांचा दंड, अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण

भाजप आमदाराला 25 वर्षांची शिक्षा, 10 लाखांचा दंड, अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण

उत्तर प्रदेशातील भाजप आमदार रामदुलार गोंड यांना एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी कोर्टाने 25 वर्षांची शिक्षा आणि 10 लाख रुपयांचा दंड शुक्रवारी ठोठावला. सोनभद्रमधील आमदार-खासदार न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. रामदुलार गोंड हे दुद्धी (आरक्षित) मतदारसंघातील भाजपचे आमदार आहेत. 9 वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप भाजप आमदारावर आहे.

खासदार-आमदार न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एहसान उल्लाह खान यांनी आरोपी आमदाराला ही कठोर शिक्षा सुनावली आहे. तसेच 10 लाख रुपयांचा दंडसुद्धा ठोठावला आहे. या पैशांचा वापर पीडित मुलीच्या पुनर्वसनासाठी केला जाणार आहे. 12 डिसेंबरला या आमदाराला दोषी ठरवण्यात आले होते. न्यायालयाने आज याप्रकरणी ही शिक्षा सुनावली. निकाल सुनावण्याच्या आधी गोंड यांच्या वकिलाने आरोपी आमदाराला कमीत कमी शिक्षा देण्याची विनंती न्यायालयाकडे केली व बलात्कार पीडितेची संपूर्ण काळजी घेतली जाईल, असे आश्वासन दिले.


आमदारकी रद्द होणार

4 नोव्हेंबर 2014 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली होती. पीडित मुलीच्या भावाने म्योरपूर पोलीस ठाण्यात रामदुलार गोंडविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. गोंड त्यावेळी आमदार नव्हते. या प्रकरणाची सुनावणी पोक्सो कोर्टात सुरू होती. गोंड आमदार झाल्यानंतर ही सुनावणी खासदार-आमदार न्यायालयात स्थलांतरित करण्यात आली होती. दरम्यान, गोंड यांची आमदारकी रद्द होणार आहे.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.