Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

24 तासात 12000 वेळा शिंकणारी मुलगी

24 तासात 12000 वेळा शिंकणारी मुलगी

वॉशिंग्टन: थंडीच्या हंगामात सर्दी झाल्यामुळे शिंका येणे ही एक नैसर्गिक स्थिती असली तरी जेव्हा हा शिंकांची संख्या जास्त असते तेव्हा मात्र ती विचित्र वैद्यकीय समस्या ठरते अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील एका मुलीला अशाच एका विचित्र वैद्यकीय समस्येने ग्रासले असून 24 तासांच्या एका दिवसामध्ये तिला तब्बल 12000 शिंका येतात या विचित्र वैद्यकीय स्थितीमुळे तिला दैनंदिन जीवन जगणेही अवघड झाले आहे.

कॅटलीन थॉर्नली असे या मुलीचे नाव असून वयाच्या 12 व्या वर्षापासून तिला ही वैद्यकीय समस्या जाणवत आहे एक दिवस टेक्सासमधील आपल्या शाळेत ती गेली असताना तिला अचानक शिंका सुरू झाल्या ज्या पंधरा मिनिटे थांबल्याच नाहीत त्यानंतर दिवसभर ती शिंकत राहिली रात्री झोपेपर्यंत तिला या शिंका येणे चालूच होते.


नंतर तिची ही शिंका येण्याची समस्या वाढतच गेली एखाद्या एलर्जीमुळे तिला हा त्रास होत असेल असे तिच्या पालकांना वाटले आणि त्यांनी त्याबाबत वैद्यकीय सल्लाही घेतला पण सर्व प्रकारचे उपचार करूनही तिच्या शिंका थांबल्या नाहीत एका मिनिटाच्या कालावधीमध्ये कॅटलिनला तब्बल 20 शिंका येतात या विचित्र परिस्थितीमुळे ती शाळेतही जाऊ शकत नाही.


कारण तिला बोलताना एक साधे वाक्यही पूर्ण करणे शक्य होत नाही दैनंदिन व्यवहार करण्यामध्ये सुद्धा अडथळे येतात ती निवांतपणे जेऊ शकत नाही त्यामुळे तिला पातळच आहार घ्यावा लागतो तो सुद्धा तिला घोट घोट असा प्यावा लागतो केवळ टेक्सासमधीलच नाही तर अमेरिकेच्या इतर राज्यातील वैद्यकीय तज्ञांनीही तिच्या या अनोख्या वैद्यकीय स्थितीची तपासणी केली आहे पण कोणत्याही डॉक्टरला तिच्या या अनोख्या आजारावर उपाय सापडलेला नाही फक्त तिला जेव्हा शांत झोप लागते तेव्हाच तिच्या शिंका थांबतात त्यामुळे तिला झोप लागेपर्यंत तिचे पालक तिच्या जवळच बसून असतात आणि तिला लवकरात लवकर झोप यावी अन तिच्या शिंका थांबावात अशी प्रार्थना ते करत असतात एखादा वैद्यकीय तज्ञ कॅटलीनच्या या अनोख्या आजारावर उपाय सुचवेल अशी आशा तीच्या पालकांना वाटत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.