Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्राग विद्यापीठात विद्यार्थ्याचा गोळीबार, 14 ठार

प्राग विद्यापीठात विद्यार्थ्याचा गोळीबार, 14 ठार


झेक प्रजासत्ताकची राजधानी प्राग येथील एका विद्यापीठात गोळीबार झाल्याची घटना समोर आली असून त्यात १४ जणांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. मात्र, पोलिसांनी प्रत्युत्तर देत संशयिताला ठार केले.चेक पोलिस आणि शहराच्या बचाव सेवेने गुरुवारी या प्रकरणाची माहिती दिली. मात्र, प्राग शहरातील गोळीबाराची परिस्थिती पोलिसांनी सांगितली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्राग पोलीस प्रमुखांनी हल्लेखोराची ओळख युनिव्हर्सिटी विद्यार्थी म्हणून केली आहे.

प्रागचे महापौर बोहुस्लाव स्वोबोडा यांनी सांगितले की, चार्ल्स विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभाग पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे. तसेच चौक पूर्णपणे सील करण्यात आला आहे. तसेच, स्थानिक लोकांना रस्त्यावर न येण्याच्या सूचना देण्यात आल्या असून लोकांना केवळ घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. shooting at Prague university या प्रकरणाची माहिती देताना झेकचे गृहमंत्री विट रकुसन म्हणाले की, घटनास्थळी दुसरा कोणीही हल्लेखोर उपस्थित नव्हता, एका हल्लेखोराला पोलिसांनी ठार केले. मी लोकांना विनंती करतो की त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे. प्रागच्या बचाव सेवेने सांगितले की, हल्लेखोराला मृत घोषित करण्यात आले आहे. या घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण गंभीर जखमी झाले

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.