Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

14 व्या मजल्यावरून कोसळली चिमुरडी तरी ठणठणीत..

14 व्या मजल्यावरून कोसळली चिमुरडी तरी ठणठणीत..


मुंबई  : देव तारी त्याला कोण मारी ! ही म्हण आपल्यापैकी बहुतांश लोकांना माहीत असेल पण कुर्ल्यातील एका कुटुंबाला याची अक्षरश: शब्दश: प्रचिती आली. कुर्ल्यात राहणाऱ्या शेख कुटुंबियांसाठी तो दिवस कधीही न विसरता येण्याजोगा आहे, जेव्हा त्यांनी त्यांच्या 13 वर्षांच्या मुलीला अगदी गमावलंच होतं, पण देवाच्या कृपेने ती सुरक्षित राहिली. काळ आला होता पण ‘तिची’ वेळ आली नव्हती, हेच अगदी खरं, ज्याच्या प्रत्यय त्यांना आला. 

असं नेमकं काय घडलं ?

कुर्ल्यातील नेहरू नगर येथे एक अल्पवयीन मुलगी इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून खाली कोसळली पण सुदैवाने तिच्या केसालाही धक्का लागला नाही आणि ती वाचली. तिला अगदी किरकोळ दुखापत झाल्याचे समोर आले आहे. हा धक्कादायक प्रकार समोर येताच त्या मुलीच्या कुटुंबियांसह ऐकणाऱ्या इतर लोकांच्याही काळजाचं अक्षरश: पाणी झालं. पण हे खरं आहे. इतक्या उंचावरून खाली पडूनही तिचा जीव वाचला आणि मोठी, गंभीर दुखापतही झाली नाही.



वाढदिवसाला मिळालेले गिफ्ट्स घेऊन ती खेळत होती इतक्यात…

सखीरा शेख असे या मुलीचे नाव असून ती कुटुंबियांसह कुर्ल्यातील नेहरू नगर येथील एका बहुमजली इमारतीत राहते. सतरा मजल्यांच्या या इमारतीमध्ये चौदाव्या मजल्यावर शेख कुटुंबाचे वास्तव्य आहे. घटना घडली त्या दिवशी सकीरा ही वाढदिवसानिमित्त मिळालेली खेळणी घेऊन घराच्या खिडकीजवळ खेळत होती. तर घरातील इतर सदस्य हे जवळच्याच खोलीत टीव्ही पहात होते. अचानक खेळता खेळता सकीराचा तोल गेला आणि ती चौदाव्या मजल्यावरील खिडकीतून थेट खालीच कोसळली.


मात्र खाली पडताना ती आजूबाजूच्या झाडांच्या फांद्याना आणि इमारती खालील शेडच्या पत्र्याला धडकत कोसळली. आपली लेक खाली कोसळल्याचे समजताच संपूर्ण कुटुंबाच्या काळजात धस्स झाले. त्यांनी कशीबशी खाली धाव घेतली. मात्र समोरील दृश्य पाहून ते स्तिमित झाले. एवढ्या उंचावरून खाली पडल्यानंतरही त्यांची मुलगी ठणठणीत होती. तिच्या हाताला थोडीफार दुखापत झाली तेवढेच, बाकी ती एकदम सुरक्षित होती. कुटुंबियांनी तिला तातडीने सायनमधील टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे तिच्यावर उपचार करण्यात आले असून आता तिची प्रकृती एकदम व्यवस्थित आहे. खरंच काळा आला होता पण ‘तिची’ वेळ आली नव्हती…


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.