Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आयुष्यभर गरिबांसारखा जगला हा अब्जाधीश, मृत्युनंतर 108 कोटी रूपये केले दान

आयुष्यभर गरिबांसारखा जगला हा अब्जाधीश, मृत्युनंतर 108 कोटी रूपये केले दान

असे क्वचितच दिलदार लोक असतात जे आयुष्यभर खूप कमाई करतात आणि मग आपला सगळा पैसा गरजू लोकांना दान करतात. एका अब्जाधीशाबाबत त्याच्या मृत्युनंतर असं रहस्य समजलं जे समोर आल्यावर लोक अवाक् झाले. त्याच्या मृत्युनंतर लोकांना समजलं की, त्याच्या खूप पैसा होता. पण त्याचे त्याचं पूर्ण आयुष्य गरिबांसारखं जगलं. इतकंच काय त्याच्याकडे मोबाइल नव्हता. कारण त्याला तो महागडा वाटत होता. तो एका सामान्य कारमध्ये प्रवास करत होता. आम्ही सांगतोय ते हम टॅरी नावाच्या व्यक्तीबाबत. ते अमेरिकेच्या इंडियानापोलिसमध्ये राहत होते. त्यांनी 30 वर्ष वृद्धांशी संबंधित एका संस्थेत काम केलं. 2021 मध्ये त्यांचं निधन झालं.


न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, हम टॅरी यांच्या परिवारात कुणीच नाही. त्यांनी मृत्युआधी आपल्या मृत्युपत्रात 13 मिलियन डॉलर म्हणजे 108 कोटींपेक्षा जास्त संपत्ती दान देण्याचा उल्लेख केला होता. पण पैसा कोणत्या संस्थेला द्यायचा याचा त्यात काही उल्लेख नव्हता. अशात टेरी यांच्या मृत्युनंतर त्यांचे वकील ड्वेन इसाक यांना आपल्या हिशेबाने हा पैसा दान करायचा होता. जेव्हाही ते एखाद्या संस्थेला फोन करत होते तेव्हा इतकी मोठी रक्कम ऐकून समोरून फोन ठेवला जायचा. संस्थांना वाटत होतं की, कुणीतरी त्यांच्यासोबत स्कॅम करत आहे. ज्या संस्थांनी इसाकच्या बोलण्यावर विश्वास ठेवला त्यांना चांगली रक्कम मिळाली. इसाकने अनेक संस्थांना फोन केला आणि त्यांना कोट्यावधी रूपये दान दिले.


इसाक म्हणाला की, तीन-चार संस्थाना पैसे मिळू शकले नाहीत. कारण त्यांनी फोनवर बोलताना या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. या फोन उचलणाऱ्यांमध्ये ऐमी हिलडेब्रांड याही होत्या. त्या एक वृद्धाश्रम चालवतात. त्या म्हणाल्या की, जेव्हा त्यांना फोनवर प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही एक मिलियन डॉलरचं काय कराल? तेव्हा त्या हैराण झाल्या. शिक्षणासंबंधी संस्थेसोबत काम करणाऱ्या मार्गारेट शीहान म्हणाल्या की, त्यांना 1.5 मिलियन डॉलर ऑफर झाले होते. जे त्यांच्या ग्रुपच्या वार्षिक बजेटपेक्षा दुप्पट होते. त्यांनाही यावर विश्वास बसला नाही.

इसाकने सांगितलं की, टॅरी काहन एका सामान्य घरात राहत होते. जुनी होंडा गाडी चालवत होते. ते म्हणाले होते की, त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्यावर काही खर्च केला जाऊ नये. इसाक म्हणाला की, यात काहीच शंका नाही की, टॅरी कुठेतरी हसत असेल. टॅरीने कधीच लग्न केलं नाही. त्यांना मुले नाहीत. परिवारात केवळ एक बहीण होती. तिचा 40 व्या वयात मृत्यू झाला. बहिणीची दोन मुले आहेत. पण काही कारणाने टॅरीने त्यांच्याशी संबंध तोडले होते. टॅरीचे आई-वडील नाझी जर्मनीतून अमेरिकेत आले होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.