Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मधुमेही रुग्णांना आता 100 टक्के देशी इन्सुलिन मिळणार, किंमतही स्वस्त

मधुमेही रुग्णांना आता 100 टक्के देशी इन्सुलिन मिळणार, किंमतही स्वस्त

भारतातील मधुमेही रुग्णांना आनंदाची बातमी आहे. मधुमेहाच्या रुग्णांना आता देशी इन्सुलिन मिळणार आणि तीही स्वस्त दरात मिळणार असल्याने ही दिलासा देणारी बातमी आहे. टाइप वन आणि काही टाइप टू मधुमेहाच्या रुग्णांना दररोज इन्सुलिनची आवश्यकता असते. साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे रुग्ण दिवसातून अनेक वेळा इन्सुलिन घेतात. आता त्यांना मेक इन इंडिया तंत्रज्ञानाने बनवलेले स्वदेशी इन्सुलिन मिळणार आहे.

भारतातील मधुमेहींसाठी आनंदाची बातमी

देशातील मधुमेही रुग्णांना आता 100 टक्के स्वदेशी इन्सुलिन मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे इतर ब्रँडच्या तुलनेत याची किंमतही कमी असणार आहे. अलीकडेच, USV ने Insuquik साठी Biogenomics सोबत भागीदारी केली आहे. हे भारतातील मधुमेह रूग्णांसाठी पहिले बायोसिमिलर इंसुलिन एस्पार्ट असणार आहे.

भारतात सुमारे 11 कोटी लोक मधुमेहग्रस्त

सध्या भारतात मधुमेहींची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. भारतात मधुमेह हा एक गंभीर आजार बनला आहे. सध्या देशातील प्रौढ लोकसंख्येपैकी 11.4 टक्के म्हणजे सुमारे 11 कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. याशिवाय सुमारे 13 कोटी लोक प्री-डायबेटिस आहेत. त्यांची स्थिती फार कमी वेळात मधुमेहापर्यंत पोहोचू शकते. अशा कालात स्वस्त दरात इन्सुलिन उपलब्ध करण्याचा प्रयत्न USV आणि Biogenomics यांच्याकडून करण्यात येत आहे.


स्वस्तात इन्सुलिन उपलब्ध होणार

आता देशातील मधुमेहींना स्वदेशी Insuquik इन्सुलिन लवकरच उपलब्ध होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Insuquik हे मेक इन इंडिया उत्पादन आहे. हे इन्सुलिन 100 टक्के स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित आणि तयार करण्यात आलं आहे. या इन्सुलिनची जागतिक दर्जाची गुणवत्ता मजबूत क्लिनिकल प्रोग्रामद्वारे सुनिश्चित केली जाते. हे सर्व मेट्रो शहरे आणि टियर-II शहरांमध्ये देखील उपलब्ध होणार आहे.

मधुमेहाच्या रुग्णांचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न

प्रशांत तिवारी, व्यवस्थापकीय संचालक, USV प्रा. लि.ने दिलेल्या माहितीनुसार, ‘आम्हाला मधुमेहाच्या रुग्णांचे जीवन सुधारायचे आहे. ओरल अँटी-डायबिटीज सेगमेंटमध्ये आघाडीवर असल्याने, इंजेक्टेबल सेगमेंटमध्ये प्रवेश केल्याने डायबेटिस मार्केटमध्ये भारताचे स्थान आणखी मजबूत होईल. मधुमेहाच्या रुग्णांना जागतिक दर्जाचे इंसुलिन एस्पार्ट देण्यासाठी आम्ही बायोजेनोमिक्सशी भागीदारी केली आहे.

'या' किंमतीला मिळणार इन्सुलिन

इन्सुक्विक कार्टिरिज (Insuquick Cartridge) : 700 रुपये

इन्सुक्विक वीडी पॅन (Insuquick VD Pan) : 915 रुपये

इन्सुक्विक वायल (Insuquik Vial) : 2321 रुपये


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.