Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

1 जानेवारीपासून बदलत आहे सिम कार्डचे नियम, जर हे केलं तर होईल 3 वर्षांची जेल

1 जानेवारीपासून बदलत आहे सिम कार्डचे नियम, जर हे केलं तर होईल 3 वर्षांची जेल


मुंबई: मोबाइल ही आता गरजेची वस्तू बनली आहे. एकीकडे मोबाइल ग्राहकांची संख्या वाढत असताना दुसरीकडे स्पॅम, स्कॅम, ऑनलाइन फ्रॉडसारखे प्रकार वाढत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी सरकारने कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. मोबाइल वापरण्यासाठी सिम कार्ड गरजेचं असतं. सिमकार्डशिवाय मोबाइलचा वापर करता येत नाही. पूर्वी नवीन सिमकार्ड अगदी सहजपणे मिळायचं; पण आता 1 जानेवारी 2024 पासून नवीन सिमकार्ड खरेदीचे नियम बदलणार आहेत. आता कोणीही सिमकार्ड सहजासहजी विकत घेऊ शकणार नाही. सरकारने नवीन सिमकार्डसंदर्भात कडक नियम केले आहेत.

2024 हे नवीन वर्ष सुरू व्हायला अगदी काही दिवस बाकी आहेत. 2023मध्ये स्कॅम, स्पॅम, फ्रॉड, ऑनलाइन फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले. आता नवीन वर्षात हे प्रकार रोखण्यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलली आहेत. सरकारने नवीन टेलिकम्युनिकेशन विधेयक सादर केलं आहे. या विधेयकात सिमकार्ड खरेदी आणि विक्रीसंदर्भातले नियम अधिक कडक केले आहेत. 1 जानेवारी 2024 पासून सिमकार्ड खरेदी संदर्भातले नवीन नियम लागू होणार आहे. आता पूर्वीसारखं सिमकार्ड सहजपणे खरेदी करता येणार नाही, 'इंडिया टीव्ही'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

देशात स्मार्टफोन युझर्सची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे ऑनलाइन फ्रॉड आणि स्कॅमची प्रकरणंही वाढत आहेत. आता सरकार यावर कडक कारवाई करणार आहे. नवीन वर्षापासून सिम खरेदीचे नवे नियम लागू होणार आहेत. कोणी बनावट कागदपत्रांद्वारे किंवा बनावट माहिती देऊन सिम खरेदी केलं तर त्याला तीन वर्षांचा कारावास आणि 50 लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो, असं सरकारनं नव्या विधेयकात स्पष्ट केलं आहे.

1 जानेवारी 2024 पासून देशभरात केवळ डिजिटल केवायसीच्या माध्यमातून नवी सिम खरेदी करता येईल. तसंच व्हेरिफिकेशन सिस्टीममध्येदेखील मोठा बदल करण्यात आला आहे. सिम व्हेंडर्सना व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आलं आहे. नव्या वर्षापासून कोणालाही बल्क सिमकार्ड्स मिळणार नाहीत; पण व्यावसायिक कारणासाठी हा नियम लागू होणार नाही. तसंच सिम खरेदी आणि विक्रीसाठी नवीन नियमानुसार, टेलिकॉम फ्रँचाइझी, सिम डिस्ट्रिब्युटर्स आणि पॉईंट ऑफ सेल एजंटला रजिस्ट्रेशन बंधनकारक असेल. एखाद्या डीलरने नवीन नियमांकडे दुर्लक्ष केलं, तर त्याला दहा लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

नवीन टेलिकम्युनिकेशन विधेयकानुसार, नवीन सिम खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचा डेटा बायोमेट्रिक पद्धतीने कलेक्ट करणं बंधनकारक आहे, असे कडक निर्देश टेलिकॉम कंपन्यांना दिले गेले आहेत. कोणी बनावट माहिती देऊन सिम कार्ड खरेदी केलं तर त्याच्याविरोधात कडक कारवाई होऊ शकते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.