Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Tinder Dating App मुळे २८ वर्षीय तरुणाची क्रूर हत्या, जाणून घ्या काय घडलं?

Tinder Dating App मुळे २८ वर्षीय तरुणाची क्रूर हत्या, जाणून घ्या काय घडलं?


२८ वर्षीय तरुणाचा आनंद गगनात मावत नव्हता जेव्हा त्याची टिंडर डेट मॅच झाली. दोघांच्याही आवडीनिवडी टिंडर अॅपवर जुळल्या. Tinder App वर तीन महिने चॅटिंग केल्यानंतर प्रिया नावाच्या मुलीने दुष्यंत या तरुणाला सांगितलं की आपण आता भेटलं पाहिजे. २७ वर्षांच्या प्रियाने दुष्यतला फोन केला आणि एक घर भाडे तत्त्वावर घे असं सांगितलं. दुष्यंतने प्रियाचं ऐकलं आणि तसं करायला तयार झाला. पुढे काय घडणार आहे हे त्याला माहीत नव्हतं.



नेमकं काय घडलं?

दुष्यंत शर्मा आणि प्रिया सेठ यांची प्रेमकहाणी २०१८ मध्ये सुरु झाली होती. मात्र दुष्यंतची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी प्रिया सेठ तिचा प्रियकर दिक्षांत कामरा आणि लक्ष्य वालिया या तिघांनाही या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावणी करण्यात आली. हा निर्णय ऐकून प्रिया सेठला रडू येऊ लागलं. मात्र ही भयंकर घटना कशी घडली ते जाणून घेऊ.


आधी दोस्ती मग प्रेमाचं नाटक

प्रिया सेठने टिंडर या मोबाइल डेटिंग अॅपच्या माध्यमातून जयपूरमध्ये राहणाऱ्या दुष्यंतशी दोस्ती केली. तीन महिने चॅटिंग केल्यानंतर हे दोघं भेटू लागले. प्रियाला वाटलं की दुष्यंत शर्मा हा पैसैवाला माणूस आहे. दुष्यंतही तिच्याशी खोटंच बोलला होता. लग्न झालेलं असूनही त्याने तिला आपण एकटेच आहोत असं सांगितलं. प्रियाने दुष्यंतचं अपहरण करण्याचा कट रचला. २ मे २०१८ रोजी प्रियाने दुष्यंतला फोन करुन भेटायला बोलवलं त्याला जयपूरच्या बजाज नगरमध्ये असलेल्या घरी नेलं. तिथे तिचे प्रियकर दीक्षांत कामरा आणि आणखी एक तरुण लक्ष्य वालिया उपस्थित होते. दुष्यंतला तिथे आणून दुष्यंतच्या आई वडिलांकडे १० लाखांची खंडणी या तिघांनी मागितली.

तीन लाखांची खंडणी घेऊनही हत्या

दुष्यंतचे आई वडील घडल्या प्रकारामुळे घाबरुन गेले होते. त्यांनी पोलिसांकडे जाण्याऐवजी तीन लाख रुपये गोळा केले आणि ते प्रियाने सांगितलेल्या बँक अकाऊंटवर जमाही केले. खंडणी मिळाल्यानंतर प्रिया दीक्षांत आणि लक्ष्य यांना असं वाटलं की आता दुष्यंतला सोडून दिलं तर हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाईल आणि आपल्याला अटक होईल. त्या भीतीतून या तिघांनी गळा दाबून दुष्यंतची हत्या केली. हत्येनंतर त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि दिल्लीतल्या आमेर डोंगररांगामध्ये फेकला. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्याच्या चेहऱ्यावर चाकूने अनेक वार करण्यात आले. तसंच पुरावे नष्ट करण्यासाठी फ्लॅटही धुऊन काढला. मात्र पोलिसांनी त्यांना याच फ्लॅटमधून ४ मे २०१८ रोजी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुष्यंत शर्मा हत्याकांडाची सूत्रधार प्रिया सेठ आहे. तिचा प्रियकर दिक्षांत कर्जबाजारी झाला होता त्यामुळे तिने दुष्यंतला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. आता या प्रकरणी कोर्टाने या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. टिंडर अॅपवरची एक ओळख आणि पुढे घडलेल्या या घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.