Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

SBI मध्ये परीक्षेशिवाय मॅनेजर बनण्याची सुवर्णसंधी,78 हजारांहून अधिक मिळेल पगार

SBI मध्ये परीक्षेशिवाय मॅनेजर बनण्याची सुवर्णसंधी,78 हजारांहून अधिक मिळेल पगार


मुंबई : पदवीधर असाल आणि बँकेत मॅनेजर म्हणून नोकरी करण्याची इच्छा असेल किंवा शोध घेत असलात, तर स्टेट बँक ऑफ इंडियात एक सुवर्णसंधी आहे. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयने डेप्युटी मॅनेजर (सिक्युरिटी/मॅनेजमेंट) या पदावर भरतीसाठी ऑनलाइन अर्जप्रक्रिया 7 नोव्हेंबरपासून सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी sbi.co.in या एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून या पदासाठी ऑनलाइन अर्ज करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 42 पदांवर भरती केली जाणार आहे. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात, ते 27 नोव्हेंबर 2023 किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. या पदांवरची भरती इंटरव्ह्यू आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन या टप्प्यांत केली जाणार आहे. त्यासाठी परीक्षा घेतली जाणार नाही. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सर्वांत आधी वयोमर्यादा, पात्रता, अर्जप्रक्रिया, वेतन, शैक्षणिक पात्रता आदी बाबींची माहिती करून घ्यावी. त्या संदर्भातली माहिती सोबत दिली आहे.

ही भरती प्रक्रिया डेप्युटी मॅनेजर (सिक्युरिटी) / मॅनेजमेंट (सिक्युरिटी) या 42 रिक्त पदांसाठी राबवली जात आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं किमान वय 25 वर्षं, तर जास्तीत जास्त वय 40 वर्षं असलं पाहिजे. अर्ज करू इच्छिणारे उमेदवार सरकारमान्य संस्था किंवा विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएट झालेले असण्याची आवश्यकता आहे.

सर्वसाधारण/ईडब्ल्यूएस/ओबीसी उमेदवारांसाठी अर्जाचं शुल्क ₹750 आहे. एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी उमेदवारांना अर्जाच्या शुल्कातून सवलत देण्यात आली आहे. याचाच अर्थ, या उमेदवारांना अर्जाचं शुल्क भरावं लागणार नाही.

अर्ज करण्याची प्रक्रिया

- sbi.co.in या SBIच्या अधिकृत वेबसाइटवर जावं.
- 'डेप्युटी मॅनेजर (सिक्युरिटी) / मॅनेजर (सिक्युरिटी) या पदांसाठी अर्ज करा' अशी लिंक होमपेजवर दिसेल. त्यावर क्लिक करावं.
- अर्ज करण्यासाठी रजिस्टर करा आणि लॉगिन करा.
- अर्ज भरा.
- अर्जासाठी आवश्यकतेनुसार शुल्क भरा.
- आवश्यक ती सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.
- संदर्भासाठी एक प्रिंटआउट काढून ठेवा.

अर्ज करण्यासाठी लिंक : https://sbi.co.in/

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.