Renew साठी आलेला Passport पाहून बसेल धक्का.. व्हिडिओ पहा
मुंबई : पासपोर्टसारखी महत्त्वाची कागदपत्र सर्वसामान्य माणूस कायमच जपून ठेवतो. पासपोर्ट हरवू नये, फाटू नये तसंच खराब होऊ नये यासाठी त्याला सुरक्षित ठेवलं जातं. पासपोर्ट फाटला किंवा खराब झाला तर त्याला रिन्यू करावं लागतं.
अशाच एका रिन्यूवलसाठी आलेल्या पासपोर्टचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पासपोर्टची अवस्था बघून अधिकारीही हैराण झाले, कारण पासपोर्टवर घरातल्या व्यक्तींचा फोन नंबर लिहिण्यात आले होते. एवढच नाही तर पासपोर्टला हिशोबाची डायरी बनवण्यात आलं होतं. हा व्हिडिओ व्हायरल असल्यामुळे सांगली दर्पण या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करू शकत नाही.
ट्विटर अकाउंट @DPrasanthNair वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 'एका वृद्ध व्यक्तीने त्याचा पासपोर्ट रिन्यूवलसाठी दिला, घरातल्या व्यक्तींनी त्याच्या पासपोर्टसोबत काय केलंय, हे त्यालाही माहिती नव्हतं. ज्या अधिकाऱ्याने हा पासपोर्ट बघितला त्यालाही धक्का बसला आहे. पासपोर्टवर लिहिलेलं मल्याळममध्ये आहे, पण तुम्हाला समजेल,' असं व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने लिहिलं आहे. तसंच हा व्हिडिओ आपल्याला व्हॉट्सऍपवर आल्याचंही त्याने सांगितलं.
या पासपोर्टवर सुरूवातीला एक फोटो आहे, तर पासपोर्टच्या आत लोकांची नावं आणि नंबर लिहिले आहेत. जुन्या काळात जेव्हा लोकांकडे स्मार्टफोन नव्हते तेव्हा अशाच प्रकारे डायरीमध्ये नाव आणि नंबर लिहिले जायचे. तर पासपोर्टच्या मागच्या पानांवर घरातला हिशोब लिहिला आहे.
या व्हिडिओला 8 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत, तसंच अनेकांनी कमेंटकरून त्यांच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. असा पासपोर्ट कधीही बघितला नाही, हा टू इन वन पासपोर्ट आहे, असं भारतातच होऊ शकतं, अशा वेगवेगळ्या कमेंट अनेकांनी केल्या आहेत. तसंच या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला दावा चुकीचा आहे, कारण हातानी लिहिलेला पासपोर्ट कधीच बंद झाला आहे, अशी कमेंटही एकाने केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.