Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ट्रकच्या मागे Horn OK Please का लिहिलं जातं? 99 टक्के लोकांना माहीत नसेल कारण

ट्रकच्या मागे Horn OK Please का लिहिलं जातं? 99 टक्के लोकांना माहीत नसेल कारण


आपण आपलं दैनंदिन आयुष्य जगत असताना काही वाक्ये नेहमीच वाचनात येतात. मात्र, त्याचे अर्थ आपल्याला माहीत नसतात. मात्र, त्याचा अर्थ कळताच आपण आश्चर्यचकित होतो. त्याचप्रकारे ट्रकमागील वाक्यांचे अर्थही माहितीपूर्ण असतात. अशाच ट्रकवरील 'हॉर्न ओके प्लीज' या वाक्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

तुम्ही रस्त्यावर अनेक ट्रक पाहिले असतील. या ट्रकच्या माध्यमातून अनेक वस्तू, माल एका जाग्यावरून दुसऱ्या जागेवर नेण्यात येतात. या मालवाहू ट्रकच्या मागे अनेक तुम्ही संदेश वाचले असतील. ट्रकमागे अनेक संदेश देणारे मजकूर लिहिले जातात. या ट्रकमागे अनेकदा 'हॉर्न ओके प्लीज' असंही वाचलं असतील. या वाक्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? तर याबाबत माहिती जाणून घेऊयात.

असंही एक कारण

भारतातील मालवाहू ट्रकमागे 'हॉर्न ओके प्लीज' लिहिलं जातं. कारण, एखाद्या वाहनाच्या मागून एखादा ट्रक किंवा एखाद्या वाहनाला पुढे जायचं असेल तर हॉर्न वाजवण्याचा नियम आहे. हॉर्न वाजवून ट्रक चालक एखाद्या वाहनाला सहज ओव्हरटेक करतो. त्यामुळे अपघातही रोखले जातात. यामुळे 'हॉर्न ओके प्लीज' लिहिलं जातं असंही अनेकांचं मत आहे.

अपघात टाळता येतात..

ओव्हरटेक करताना समोरून कोणतंही वाहन येत नसेल तर एक इंडिकेटर देऊन ट्रकचालक पुढे जातो. इंडिकेटर देऊन ट्रक चालक आरामात पुढे जातो. 'हॉर्न ओके प्लीज' इंडिकेटरमुळे अपघात रोखण्यास मदत मिळते. दरम्यान, सोशल मीडियाच्या क्वॉरा या साइटवर एका युजरने याबाबत प्रश्न केला होता. त्यानंतर क्वॉरावरील युजर्सने त्या युजर्सला उत्तर दिले.

'हॉर्न ओके प्लीज' म्हणजे काय?

एका मीडिया वृत्तानुसार, 'हॉर्न ओके प्लीज' चा अर्थ म्हणजे एखादा वाहनचालक ओव्हरटेक करण्यापूर्वी हॉर्न देऊन माहिती देतो. काही वर्षांपूर्वी अनेक ट्रकमध्ये साईड मिरर उपलब्ध नव्हते. त्यामुळे रस्त्यावर चालक गाडी चालवत असताना त्या वाहनाच्या मागून येणाऱ्या वाहनांच्या माहितीसाठी लिहावं लागायचं.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.