Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बांधकाम साहित्य, मशीन चोरणाऱ्यास अटक, ४ गुन्हे उघड२५ हजारांचा मुद्देमाल जप्त, सांगली शहर पोलिसांची कारवाई

बांधकाम साहित्य, मशीन चोरणाऱ्यास अटक, ४ गुन्हे उघड२५ हजारांचा मुद्देमाल जप्त, सांगली शहर पोलिसांची कारवाई

सांगली :  बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणासह अन्य ठिकाणांहून बांधकामाचे साहित्य, मशीन चोरणाऱ्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणून २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सांगली शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिली.

भरत नामदेव जाधव (वय ४०, रा. खणभाग, गोसावी गल्ली, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. बांधकाम साहित्य आणि मशीन चोरणाऱ्यांचा छडा लावण्याच्या सूचना पोलिस निरीक्षक श्री. देशमुख यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार एक पथक चोरट्यांचा शोध घेत होते.

एकजण चोरीला माल विक्री करण्यासाठी भंगार बाजार येथे येणार असल्याची माहिती पथकाला खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने भंगार बाजार परिसरात सापळा लावला होता. त्यावेळी भरत जाधव चोरीचे गेट विक्री करण्यासाठी तेथे आला. पथकाने संशयावरून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने सांगली शहर परिसरातून बांधकामाचे साहित्य, मशीन चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करून चोरीचा माल जप्त करण्यात आला. 

सांगलीचे शहरचे उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, विनायक शिंदे, सचिन शिंदे, श्रीपाद शिंदे, संतोष गळवे, गौतम कांबळे, सुमित सूर्यवंशी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.