Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रयतच्या माजी विद्यार्थ्यांची अनोखी गुरुदक्षिणादरवर्षी शिक्षकांच्या भेटीचा सोहळा

रयतच्या माजी विद्यार्थ्यांची अनोखी गुरुदक्षिणादरवर्षी शिक्षकांच्या भेटीचा सोहळा


सांगली: तडसर (ता. कडेगाव) मधील रयत शिक्षण संस्थेच्या तात्यारावजी विद्यालयात शिकलेल्या 1993 च्या बॅचने अनोखी गुरुदक्षिणा देण्याची परंपरा जपली आहे. दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी एका शिक्षकांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करणारा हा अनोखा सोहळा गेली दहा वर्षे सुरु आहे.

या शाळेच्या 1993 च्या बॅचने गेल्या दहा वर्षापासून जो उपक्रम सुरू केला आहे तो भारावून आणि गहिवरून टाकण्यासारखा आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या नावलौकिक तयार करून स्थिरावलेली या बॅचची मुलं प्रत्येक पाडव्याला गावात एकत्र येतात आणि तिथून ती आपल्या शिक्षकांच्या भेटीला जातात. दरवर्षी प्रत्येक पाडव्याला ही मुलं आपल्या एका शिक्षकाची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतात. त्या शिक्षकांचा मनःपूर्वक सत्कार करतात. गप्पा मारतात. इतकी वर्षे मनात असलेल्या हजारो आठवणी सांगायला नुसती चढाओढ लागते. मग सारी जण आशीर्वाद घेतात आणि परत आपापल्या गावाकडे परत फिरतात.  हिंमतराव जाधव, विद्यानंद कदम, दिपक पवार, नंदकुमार काळे, केतन इनामदार, संदीप कोरे, किरण इनामदार, शंकर जाधव, विवेक पवार, शिवनंदन  पवार,  व्यंकट होलमुखे, तानाजी पवार, संदीप पवार, प्रदीप महाडिक यांनी हा उपक्रम सुरु ठेवला आहे. 

आजपर्यंत या विद्यार्थ्यांनी मोहनराव पाटील गुरुजी इस्लामपूर, चंद्रकांत कुंभार कराड, उत्तम जगताप कराड, डी.व्ही. बन्ने सर बन्नेवाडी, पी.एल. भारते सर बलवडी, डी.व्ही. महाडीक सर चिंचणी, जी.टी.पाटील सर  आष्टा, जी.वाय. शिंदे कडेगाव, डी.एन.जाधव तडसर, व्ही.एस.सुर्यवंशी अपशिंगे, अनुसया मांडके शिरसगाव, राम गुरुजी तडसर, भिमराव पवार तडसर, एस.एन. गुरव सांगली या शिक्षकांना भेट देऊन सत्कार केला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.