Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पावसामुळे व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान मनपाने पंचनामा करून भरपाई द्यावी.--- राज्य प्रवक्ते संतोष पाटील.

पावसामुळे व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान मनपाने पंचनामा करून भरपाई द्यावी.--- राज्य प्रवक्ते संतोष पाटील.

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम सांगली या ठिकाणी दिवाळीमध्ये व्यापाऱ्यांच्या मालाची विक्री करण्यासाठी उभारलेल्या स्टॉलवर अचानक जोरात पाऊस कोसळल्यामुळे गोरगरीब व्यापाऱ्यांचे दिवाळी सणासाठी विक्री करण्यासाठी आणलेले  साहित्य, कपडे व दिवाळी करता लागणारे सर्व साहित्य खूप मोठा अचानक पाऊस पडल्यामुळे नुकसान झाले आहे.

महापालिकेने त्यांना व्यापाऱ्यांची इच्छा नसताना सुद्धा जबरदस्ती करून या ठिकाणी स्टॉल दिले. मागील शनिवारी त्यांची महापालिकेच्या प्रशासनणे त्यांची इच्छा नसताना त्यांना आंबेडकर स्टेडियम मध्ये अडीच हजार रुपये चार्ज लावून स्टॉल देण्यात आले. त्यावेळेला सर्व व्यापाऱ्याने आपल्या डोळ्यात पाणी आणून पाया पडून अधिकाऱ्यांना महापालिकेजवळ आम्हाला यावर्षी आमची व्यवस्था करावी अशी विनंती केली होती परंतु ते महापालिका प्रशासनाने ऐकले नाही त्यांच्या या मनमानी कारभारामुळे सर्व व्यापाऱ्यांना सर्व दिवाळीचे साहित्याचे पडलेल्या पावसामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे. याची भरपाई महापालिकेने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अन्यथा महापालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी दिला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.