Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतीय टीम जेव्हा-जेव्हा क्रिकेट वर्ल्डमध्ये फायनलमध्ये पोहोचते, तेव्हा-तेव्हा देशाच्या विद्यमान पंतप्रधानांची खुर्ची जाते, पहा आकडेवारीनुसार

भारतीय टीम जेव्हा-जेव्हा क्रिकेट वर्ल्डमध्ये फायनलमध्ये पोहोचते, तेव्हा-तेव्हा देशाच्या विद्यमान पंतप्रधानांची खुर्ची जाते, पहा आकडेवारीनुसार


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषकाचा अंतिम सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. सर्व तयारी पूर्ण झाली आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सहा हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. हा क्षण पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहणार आहेत. अहमदाबाद शहराचे पोलिस आयुक्त जी. एस. मलिक यांनी सांगितले की, रॅपिड अॅक्शन फोर्स कंपनीसह स्टेडियममध्ये तीन हजारांहून अधिक पोलिस तैनात केले जातील. या सामन्यादरम्यान सुमारे सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ आपापल्या प्लेईंग-११ मध्ये कोणताही बदल करणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया बरेच बदल करताना दिसत असताना शुभमन गिलला डेंग्यू ची लागण झाल्यानंतर आणि हार्दिक पांड्या जखमी झाल्यानंतर टीम इंडियाला बदल करावे लागले. एकाबाजूला भारत फायनामध्ये पोहोचला आहे आणि सर्व देशवासीय भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत. पण दुसरीकडे अजून एक महत्वाची चर्चा सुद्धा समाज माध्यमांवर आकडेवारीनुसार सुरु झाली आहे.

भारतीय टीम जेव्हा-जेव्हा क्रिकेट वर्ल्डमध्ये फायनलमध्ये पोहोचते, तेव्हा-तेव्हा देशातील विद्यमान पंतप्रधानांची पुढील लोकसभा निवडणुकीत खुर्ची जाते हा इतिहास आहे. डॉ. मनमोहन सिंग यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ हा १० वर्षाचा होता. त्या दरम्यान, म्हणजे २००३ नंतर भारतीय क्रिकेट टीम फायनलमध्ये पोहिचली नाही. तर 2019 मध्ये तेच झालं आणि मोदी पुन्हा पंतप्रधान झाले होते. आता २०२३ क्रिकेट वर्ल्डमध्ये फायनलमध्ये भारतीय टीम फायनलमध्ये पोहिचली आहे आणि २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका आहेत.

१९८३ - भारतीय टीम फायनलमध्ये पोहोचली आणि वर्ल्ड कप सुद्धा जिंकला - इंदिरा गांधी यांची पुढच्या निवडणुकीत पंतप्रधान पदाची खुर्ची गेली

२००३ - भारतीय टीम फायनलमध्ये पोहोचली आणि वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभव झाला - अटल बिहारी वाजपेयी यांची पुढच्या निवडणुकीत पंतप्रधान पदाची खुर्ची गेली

२०११ - भारतीय टीम फायनलमध्ये पोहोचली आणि वर्ल्ड कप सुद्धा जिंकला - डॉ. मनमोहन सिंग यांची पुढच्या निवडणुकीत पंतप्रधान पदाची खुर्ची गेली

२०२३ - आता भारतीय टीम फायनलमध्ये पोहोचली आहे. वर्ल्ड कप जिंकावा ही सर्व देशवासीयांची आशा, पण भाजपचा २०२४ मध्ये पराभव होऊन विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाची खुर्ची जाणार याची चर्चा सुद्धा समाज माध्यमांवर सुरु झाली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.