Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अनेक राज्यांत पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ! महाराष्ट्रातही पेट्रोल महागलं

अनेक राज्यांत पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ! महाराष्ट्रातही पेट्रोल महागलं

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये आज शानदार तेजी पाहायला मिळाली. मंगळवारी सकाळी 6 वाजेदरम्यान WTI क्रूड 77.60 डॉलर प्रति बॅरलवर विकलं जातंय. तर ब्रेंट क्रूड 82.32 डॉलर प्रति बॅरलवर ट्रेड करत आहे. देशात तेल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या ताज्या किंमती जारी केल्या आहेत. भारतात रोज सकाळी 6 वाजता इंधनाच्या किंमतींमध्ये सुधारणा केली जाते. जून 2017 पूर्वी दर 15 दिवसांनी किमतींमध्ये सुधारणा केली जात होती.

महाराष्ट्रात पेट्रोल 1 रुपये तर डिझेल 97 पैशांनी वाढले आहे. आज छत्तीसगडमध्ये पेट्रोल 60 पैशांनी तर डिझेल 59 पैशांनी महागलं आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि त्रिपुरामध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किंचित वाढ झाली आहे. तामिळनाडू आणि गुजरातमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहे. याशिवाय बहुतांश राज्यांमध्ये दरात कोणताही बदल झालेला नाही.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

- दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 90.08 रुपये प्रति लिटर

- मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

- कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल92.76 रुपये प्रति लिटर

- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.74 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर


दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात आणि नवीन दर जाहीर होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साइज ड्यूटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेल एवढ्या महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्ही आजच्या लेटेस्ट किमती जाणून घेऊ शकता

पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक 9224992249 या क्रमांकावर RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड लिहून 9223112222 या क्रमांकावर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड टाइप करून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.