Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

छगन भुजबळांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न; काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी; व्हिडिओ पहा

छगन भुजबळांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न; काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी; व्हिडिओ पहा

नांदेड:  राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आणि ओबीसी नेतेमंडळीत शाब्दीक हल्लाबोल होताना दिसून येत आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मंत्री छगन भुजबळ यांना लक्ष्य केलं जातय.

तर, भुजबळ हेही जरांगे पाटलांवर थेट प्रहार करताना दिसून येतात. दरम्यान, भुजबळ यांच्या नेतृत्त्वात जालन्यातील अंबड येथे ओबीसींचा महाएल्गार मेळावा पार पडला होता. आता, अंबडनंतर हिंगोली जिल्ह्यात ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र, छगन भुजबळ यांची हिंगोली येथील सभा उधळून लावण्याचा इशाराही मराठा आंदोलकांकडून देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भुजबळ यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे हिंगोली येथील महा एल्गार मेळाव्याला जाण्यासाठी नांदेड विमानतळ येथून बाहेर पडल्यावर मराठा आंदोलनकर्त्यांनी त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी, आंदोलकांकडून त्यांना काळे झेंडेही दाखविण्यात आले. याप्रकरणी, पोलिसांनी लगेच चार जणांना ताब्यात घेतले. स्वराज्य संघटनेने हिंगोली येथील ओबीसींचा एल्गार मेळावा उधळून टाकण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांनी सकाळ पासूनच विमानतळ रस्त्यावर मोठा बंदोबस्त वाढविला होता. तर, स्वराज्य संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना नांदेड ग्रामीण पोलिसांनी अगोदरच ताब्यातही घेतले होते. दरम्यान, स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माधव देवसरकर व त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांना नांदेड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.