Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

न्यायालयानं २ पोलिसांना ठोठावली गवत काढण्याची शिक्षा

न्यायालयानं २ पोलिसांना ठोठावली गवत काढण्याची शिक्षा


छत्रपती संभाजीनगर :  न्यायालयात अर्धा तास उशीरा पोहोचलेल्या दोन पोलिसांना न्यायालयानं गवत काढायची शिक्षा ठोठावल्यानं मोठी खळबळ उडाली. ही शिक्षा परभणी इथल्या न्यायालयानं ठोठावली आहे. मानवत पोलीस ठाण्यातील हवालदार आणि पोलीस शिपायाला ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

न्यायाधीशांनी मानवत पोलीस ठाण्याच्या हवालदार आणि शिपायाला न्यायालयात पोहोचण्यास उशीर झाला म्हणून गवत काढण्याची शिक्षा ठोठावली होती. ती पोलीस कर्मचाऱ्यांनी भोगलीही आहे. मात्र रात्री गस्तीवर असताना पोलिसांना न्यायालयात पोहोचण्यास उशीर झाला होता. पोलिसांनी पकडलेल्या संशयितास 24 तासात न्यायालयात हजर करावं लागते. त्यामुळे रात्री गस्तीवर असतानाही मानवत पोलीस ठाण्याचे कर्मचारी संशयिताला घेऊन न्यायालयात पोहोचले. त्यामुळे या प्रकरणी वरिष्ठ न्यायाधीशांना पत्र देण्यात आलं आहे. उच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीशांनाही पत्र दिलं आहे.

मानवत पोलीस ठाण्यातील हवालदार आणि पोलीस शिपाई 22 ऑक्टोबरला रात्रीच्या गस्तीवर होते. त्यांनी रात्री मानवत इथं दोन संशयिताना संशयास्पद फिरताना ताब्यात घेतलं होतं. त्याची नोंद त्यांनी पोलीस ठाण्याच्या डायरीत घेतली होती. ताब्यात घेतलेल्या संशयित व्यक्तीला 24 तासाच्या आत न्यायालयात हजर करणं बंधनकारक असते. त्यामुळे सुट्टीचा दिवस असल्यानं पोलिसांनी न्यायाधीशांची वेळ घेतली. यावेळी न्यायालयानं सकाळी अकरा वाजताची वेळ दिली होती. मात्र रात्री कर्तव्यावर असल्यानं पोलिसांना सकाळी न्यायालयात या पोहोचण्यास अर्धा तास उशीर झाला. त्यामुळे न्यायाधीशांनी पोलिसांना उशीरा न्यायालयात आल्यानंतर चांगलचं खडसावलं.
पोलीस हवालदार आणि शिपाई न्यायालयात अर्धा तास उशीरा दाखल झाले. न्यायालयात अर्धा तास उशीरा आलेल्या पोलिसांमुळे न्यायाधीशांनी जाब विचारला. यावेळी न्यायाधीशांनी त्यांना गवत काढण्याची शिक्षा ठोठावली. न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना गवत काढण्यासाठी विळे आणून दिले. त्यामुळे पोलीस हवालदार आणि पोलीस शिपायानं न्यायालय परिसरातील गवत काढून न्यायाधीशांनी ठोठावलेली आपली शिक्षा पूर्ण केली. मात्र रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशीर झाल्यानं गवत काढण्याची शिक्षा केल्यानं पोलीस वर्तुळात चर्चाना उधाण आलं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.