Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खळबळ! एका विवाहित महिलेस बदाम चिन्ह काढून त्यावर आय लव यू लिहून दिली चिठ्ठी; एकावर गुन्हा दाखल

खळबळ! एका विवाहित महिलेस बदाम चिन्ह काढून त्यावर आय लव यू लिहून दिली चिठ्ठी;  एकावर गुन्हा दाखल


एका ३५ वर्षीय विवाहित महिलेच्या घरामध्ये दोन चिठ्या टाकून तुझ्यावर माझा खूप जीव आहे, मी तुला संभाळतो आय… लव… यू….असे बदाम चिन्हात लिहून मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी एका राजू नामक मिस्त्री (रा.मंगळवेढा) याच्या विरुध्द कलम ३५४ (अ), ३५४ (ड), ५०९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील ३५ वर्षीय फिर्यादी महिला ही दि.१७ रोजी रात्री ११ वाजता तिच्या कुटूंबासह कर्नाटकातील बागलकोट येथे खाजगी वाहनाने देवकार्य करण्यासाठी गेली होती.

दि.२१ रोजी सकाळी ७ वाजता ती पुन्हा आपल्या मुळ गावी घरी आल्यावर घराचे कुलूप उघडून घरात जात असताना फिर्यादीस दोन चिठ्ठ्या पडलेल्या दिसल्या. फिर्यादीस वाचता येत नसल्याने तिने एका शिकलेल्या मुलीस बोलावून घेवून चिठ्ठी वाचण्यास सांगितले असता त्या चिठ्ठीमध्ये मी राजू मिस्त्री तु आमच्याकडे कामाला ये ना, तुझ्यावर माझा खूप जीव आहे, मी तुला संभाळतो, त्या दिवशी मी सांगणार होतो पण डमडम मध्ये तु होतीस म्हणून सांगितले नाही, त्यामुळे मी एका मुलीजवळ चिठ्ठी पाठविली आहे.

तु कधी येतेस ते सांग मी खूप खूप वाट बघत आहे लवकर ये असे म्हणून चिठ्ठीवर बदाम चिन्ह काढून त्यात राजू व फिर्यादीचे नाव लिहून अशा मजकूराची चिठ्ठी फिर्यादीच्या मनास लज्जा निर्माण होईल असे चिठ्ठीत लिहून दोन चिठ्या घरामध्ये टाकलेल्या फिर्यादीच्या निदर्शनास आल्या.

दुसऱ्या दिवशी याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी राजू मिस्त्रीची वाट पाहिली मात्र तो आलाच नाही. या चिठ्ठीमुळे आरोपीने नको असलेली मैत्री संपादन करण्याचा व एका पेक्षा जास्त चिठ्या टाकून फिर्यादीचा पाठलाग केल्याने फिर्यादी घाबरुन गेल्या. त्यांनी गावच्या ग्रामपंचायत सदस्या यांना ही घटना कथन करुन ते तक्रार देण्यास मंगळवेढा पोलीस ठाण्यात आजरोजी आले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान याचा अधिक तपास बोराळे बीटचे पोलीस हवालदार महेश कोळी हे करीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.