Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्रात टिपू सुलतानच्या जयंतीला ताकदीने विरोध करू; 'हिंदू एकता आंदोलन'चा महत्त्वपूर्ण निर्णय

महाराष्ट्रात टिपू सुलतानच्या जयंतीला ताकदीने विरोध करू; 'हिंदू एकता आंदोलन'चा महत्त्वपूर्ण निर्णय


सांगली : टिपू सुलतान जयंती  साजरी करण्यावर राज्य शासनाने बंदी घालावी, अशी मागणी करून जयंतीला हिंदू एकता आंदोलन  ताकदीने विरोध करणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

हिंदू एकता आंदोलनच्या सांगली शहर पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत सांगली महानगरपालिका  क्षेत्रात हिंदू एकता आंदोलन या संघटनेची भक्कम बांधणी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची निवड करणे व संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये शाखा उघडणे या विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीच्या सुरुवातीस एकता आंदोलनाचे शहर-जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक हिंदू केले.

प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, ''टिपू सुलतान जयंतीवर राज्यातल्या सरकारने बंदी घालावी, तसेच टिपू सुलतानचे पोस्टर छापण्यावर बंदी घालावी. राज्यात होणारे उदात्तीकरण तत्काळ थांबले पाहिजे. टिपू सुलतानच्या जयंतीला परवानगी देऊ नये.''

या वेळी प्रसाद रिसवडे, श्रीकांत शिंदे, ॲड. होमकर, राजू जाधव, शिवाजी पाटील, गोपाळराव माने, रामभाऊ सूर्यवंशी, अजय वाले, रवी वादवणे, अवधूत जाधव, अमित सूर्यवंशी आदींनी हिंदू एकता आंदोलनाची भक्कम बांधणी करण्याबरोबरच उपक्रम राबविण्यासंदर्भात सूचना केल्या. 
शहराध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी सचिन देसाई, राकेश कलकुटगी, संभाजी पाटील, अशोक पाटील, श्रीधर मिस्त्री, आशिष साळुंखे, सुनील जाधव, अनिरुद्ध कंभार, ओंकार देशपांडे, नारायण हांडे आदींसह हिंदू एकता आंदोलनाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.