Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली सिव्हिल मध्ये उपचारासाठी हलगर्जीपणा तरुणाचा मृत्यू-रिपाइंचे आंदोलन

सांगली सिव्हिल मध्ये उपचारासाठी हलगर्जीपणा तरुणाचा मृत्यू-रिपाइंचे आंदोलन

सांगली :- ऋषिकेश पोपट सावंत मुळ गाव शेगाव ता.जत सध्या राहणार राजर्षी शाहू काँलनी, सांगली वय २३ याचा सोमवार दि.६ रोजी रात्री १०.३० दरम्यान बालाजी मिल जवळील महादेव मंदीरासमोर अपघात झाला.नातेवाईकासमवेत तो दुचाकी वरुन जात असताना चारचाकी व दुचाकीचा अपघात झाल्यानतंर त्याच्यासमवेत असणारा तरुण व अन्य व्यक्तीनी त्यास गंभीर अवस्थेत सांगली येथील डॉ. वसंतदादा पाटील सर्वोपचार हाँस्पिटल मध्ये दाखल केले.तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित उपचार केले नाहीत. शिवाय तज्ञ डॉक्टर नसताना भुल देऊन पायास टाके घातले खाजगी सिटीस्कँन लँबचा  जो रिपोर्ट(अवहाल) आलेला होता त्यामध्ये मेंदूला सुज असुन नाका-कानातून रक्तश्राव होत आहे.

असे नमुद असतानाही सकाळी ६ वाजता रुग्ण बरा झालेला आहे. त्यास घरी घेऊन जावा म्हणून डिसचार्ज दिला घरी आलेनतंर त्यास त्रास होऊ लागल्याने नातेवाईकांनी त्यास सिव्हिल हाँस्पिटल मध्ये घेऊन गेले असता सदरचा रुग्ण मृत असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले त्यानंतर नातेवाईकांनी गोंधळास सुरुवात केली रिपब्लिकन पक्षाचे जगन्नाथ ठोकळे, सुरेश दुधगावकर, आशिष उर्फ मनोज गाडे, शिवाजी वाघमारे,किशोर होवाळ, सुरज पवार,अविनाश कांबळे,किशोर सुर्यवंशी,अजय उबाळे यांनी याप्रश्नी सिव्हिल हाँस्पिटलचे प्रभारी जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. जोशी,विभाग प्रमुख डॉ. यांच्यासह अन्य डॉक्टरांना धारेवर धरले विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय मोरे,सहा.पोलीस निरीक्षक संदिप वाघमारे यांच्यासह पोलीस फौजफाटा दाखल झाला. त्यानंतर शहर विभागाचे उपअधिक्षक आण्णासाहेब जाधव यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली.


त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष इनकँमेरा शवविच्छेदन करणे,सिव्हिल सर्जन यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञ डाँक्टरांच्या समितीकडून चौकशी करणे,  दोषी डॉक्टर व कर्मचारी यांच्यावर अनैसर्गिक व हलगर्जीपणा यामुळे मृत्यू्स कारणीभूत म्हणून अनु.जाती/जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमानव्ये कारवाई करणे याबाबतीत चर्चा झालेनतंर जमाव शांत झाला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.