Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्मवीर पतसंस्था सांगलीस नव्याने ७ शाखा विस्तारास मंजुरी - चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील

कर्मवीर पतसंस्था सांगलीस नव्याने ७ शाखा विस्तारास मंजुरी - चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील


सांगली : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सांगली यांना आणखी ७ शाखा विस्तारास नुकतीच मंजुरी मिळाली असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.


या शाखा विस्तारामुळे संस्थेला नविन ठिकाणच्या सभासदांपर्यंत पोहचून त्यांनी संस्थेची सेवा देता येणार असल्यामुळे त्याचा आनंद होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली नव्याने मंजुरी मिळालेल्या शाखा पुढील प्रमाणे आहेत. १) कागल ता. कागल जि. कोल्हापूर २) गोकुळ शिरगांव ता. करवीर जि. कोल्हापूर ३) उचगांव ता. करवीर जि. कोल्हापुर ४) मंगळवार पेठ मिरज ता. मिरज ५) कराड ता. कराड जि. सातारा ६) कबनूर ता. हातकणंगले जि. कोल्हापूर ७) वारणा कोडोली ता. पन्हाळा जि. कोल्हापूर ठिकाणी शाखा सुरु करण्यास मंजुरी मिळाली आहे. संस्थेला सातारा जिल्ह्यात शाखा विस्तारास मंजुरी मिळाल्यामुळे संस्थेचा आणखी कार्य विस्तार होणार आहे. मंजुर झालेल्या शाखा या आर्थिक वर्षात लवकरात लवकर सुरु करणार असून त्यामुळे संस्थेच्या शाखांची संख्या ६७ होणार आहे.

संस्थेचे कार्यक्षेत्र सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्हा आहे. संस्था ३६ वर्षापासून सभासदांना आर्थिक सेवा पुरवित आहे. संस्थेचे भागभांडवल ३१ कोटी असून संस्थेचा स्वनिधी ९२ कोटी आहे. संस्थेच्या ठेवी १०१० कोटी असून ७६० कोटीचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेची गुंतवणूक २८९ कोटीची आहे. सध्या ६० शाखा मधुन संस्थेची आधुनिक सेवा सुरु असून संस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. सभासद संख्या ६२००० आहे. संस्थेचा एकूण व्यवसाय २००० कोटीकडे वाटचाल करीत आहे.

संस्थेचे आधुनिक मुख्य कार्यालय सांगली येथे आहे. संस्थेने अनेक आकर्षक व्याजदराच्या ठेव योजना राबविल्या असून सभासदांना त्याचा लाभ होत आहे. कर्जाच्या अनेक योजनांच्या माध्यमातून संस्था गरजुंना कर्जाचा पुरवठा करुन त्यांचे जीवनमान उंचावत आहे. संस्थेचे संपुर्ण कामकाज ऑनलाईन संगणकीकृत असून NEFT/RTGS/QR CODE अशा अनेक सेवा संस्था पुरवित आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल मगदुम यांनी दिली.

यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे, संचालक अॅड. एस.पी. मगदुम, डॉ. रमेश वसंतराव ढबू, श्री. ए. के. चौगुले (नाना) श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले, डॉ एस.बी. पाटील (मोटके) डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील, संचालिका श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे, सौ. चंदन नरेंद्र केटकाळे तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, श्री. लालासाहेब भाऊसाहेब थोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदूम उपस्थित होते..

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.