Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ऐन दिवाळीत आनंदाचा शिधा मिळाला नाही; मनोज भिसे; व्हिडिओ पहा

ऐन दिवाळीत आनंदाचा शिधा मिळाला नाही; मनोज भिसे; व्हिडिओ पहा

महाराष्ट्र शासनाच्या वतीने मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये शंभर रुपयात तेल, साखर, चणाडाळ, मैदा, रवा,पोहे आदी वस्तू दिल्या जातात, परंतु आज पर्यंत फक्त शहरी भागात 60% तर ग्रामीण भागात केवळ 40% इतक्या प्रमाणातच या शिधाचं वाटप झाले आहे.उर्वरित लाभार्थी दिवाळीतही त्याच्या प्रतीक्षेत आहेत .अनेक ठिकाणी नेटवर्क नसल्याने या वाटपात अनेक अडथळे येत आहेत.

तरी या आनंदाच्या शिध्याचे वाटप प्रशासनाने ऑफलाइन पद्धतीने करावे, अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आपणास करत आहोत.दिवाळीचे दिवस असेपर्यंत तरी हा आनंदाचा शिधा लाभार्थ्यांच्या पदरात पडावा हिच अपेक्षा!



प्रत माहितीसाठी.....

मा.ना. एकनाथ शिंदे साहेब. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य .

 मा.ना. छगन भुजबळ साहेब.अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य.

मा.ना. सुरेश भाऊ खाडे साहेब कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा .


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.