Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत बंद गोदाम फोडणाऱ्या तीन महिलांना अटक एक लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली शहर पोलिसांची कारवाई

सांगलीत बंद गोदाम फोडणाऱ्या तीन महिलांना अटक एक लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली शहर पोलिसांची कारवाई

सांगली :  सांगली शहरातील गणपती पेठ परिसरातील एक बंद गोदाम फोडून त्यातील विविध प्रकारचे कपडे चोरणाऱ्या तीन महिलांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

रंजना सुरेश घाडगे (वय ४०), सुनीता संदीप घाडगे (वय ४२), सुनीता भारत जाधव (वय ३९, सवर् रा. खणभाग, सांगली) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. गणपती पेठ येथील एक कपड्याचे गोदाम फोडल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत मुमताज शेख यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. हा गुन्हा दाखल झाल्याने शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी याचा तातडीने तपास करण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. 

पथक चोरट्यांचा शोध घेत असताना खणभाग येथील गोसावी गल्लीत काही महिला चोरीचे कपडे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पथकाने यावेळी तीन महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गणपती पेठेतील बंद गोदाम फोडून कपडे चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्याकडील चोरीचे कपडे जप्त करून त्यांना अटक करण्यात आली. 

पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, प्रवीण शिरसाट, संदीप पाटील, विनायक शिंदे, श्रीपाद शिंदे, योगेश पाटील, सपना गराडे, सीमा धनवडे, काजल चव्हाण, रूक्मिणी गायकवाड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.