Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आधी थुंकायला लावले मग तेच चाटायला लावले

आधी थुंकायला लावले मग तेच चाटायला लावले

झारखंडमधील तिसरटेटूका गावात राहणाऱ्या विवाहितेसोबत गावच्या पंचायत समितीने किळसवाणे कृत्य केल्याचे वृत्त आहे. झारखंडच्या पंचायत समितीने या महिलेला आधी भुंकण्यास सांगितले व तेच चाटण्यास तिला भाग पाडले. त्यानंतर पंचायत समितीच्या सदस्यांनी तिला चपलेने मारहाण केली. एवढ्यावर ते थांबले नाहीत. त्या महिलेला 100 वेळा उठाबश्या देखील काढायला लावल्या आणि 56 हजारांचा दंड देखील ठोठावला आहे. हा प्रकार घडत असताना गावकऱ्यांनी देखील त्या महिलेची मदत केली नाही. ती महिला चारित्र्यहीन असल्याचा आरोप पंचायतीने केला आहे.

महिलेने ऑनलाईन तक्रार दाखल केली

महिलेने तिच्यावरील आरोप फेटाळून लावला असून पंचायच समितीने दिलेल्या त्रासामुळे मदतीसाठी तिने थेट पोलीस स्टेशन गाठलं. परंतु पोलिसांनी तिची तक्रार घेतली नाही. यानंतर तिने अथक प्रयत्नांनंतर ऑनलाईन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तिची तक्रार ऐकण्यास नकार दिल्याने महिलेने पोलिसांवरही आरोप केला आहे.


ऑनलाईन तक्रारीनंतर मिळाला न्याय

पीडित महिलेने ऑनलाईन तक्रार दाखल केल्यानंतर लगेचच तिला न्याय मिळाला. जिल्ह्याच्या एसपींनी ही घटना लाजिरवाणी असल्याचे म्हटले असून 8 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 15 ऑगस्टला घडली असल्याचे बोलले जात आहे. बुधवारी 23 नोव्हेंबरला या प्रकरणाची तक्रार नोंदवल्यामुळे लोकांना याबद्दल माहिती मिळाली. पोलिसांनी सांगितले की, महिलेची तक्रार नोंदवली गेली नाही कारण तिच्या पतीने यापूर्वी त्याची पत्नी हरवल्याची तक्रार नोंदवली होती. सध्या या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


हातपंपावरही पाणी भरण्यास बंदी

पीडितेचे म्हणणे आहे की, तिला गावातील हातपंपावर पाणी भरण्यासही बंदी घालण्यात आली आहे. हे सर्व केवळ मला चारित्र्यहीन सिद्ध करण्यासाठी केले गेले आहे. तसेच मला समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेशही समितीने जारी केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.